Tarun Bharat

वेंगुर्लेत रोटरी होप एक्सप्रेसतर्फे कॅन्सर डिटेक्शन कॅम्प

वेंगुर्ले /वार्ताहर-

समाजातील गरजू लोकांसाठी रोटरी होप एक्सप्रेस कॅन्सर डिटेक्शन कॅम्प अतिशय महत्त्वाची लोकोपयोगी सेवा असुन, हि मोफत तपासणी-रोगनिदान व उपचार सुविधा वेंगुर्ले रोटरी मिडटाऊनने जनसामान्यांना उपलब्ध करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जनतेने मोठया प्रमाणावर या मोफत सेवेचा लाभ घेऊन, निरोगी सुदृढ जिवनशैली अंगिकारावी. असे आवाहन वेंगुर्ले नगराध्यक्ष रोटरीयन दिलीप गिरप यानी केले.


रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 गव्हर्नर रोटरीयन गौरीश धोंड यांच्या नेतृत्वाखाली, डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सर्व्हिस सेक्रेटरी डॉ. लेनि डिसोजा, डिस्ट्रिक्ट कोऑर्डीनेटर सचिन मेणसे, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. प्रमोद माने यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग-गोवा भागातील लोकांसाठी मोफत होप एक्सप्रेस कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.


येथील बँ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज येथे रोटरीच्या होप एक्सप्रेस कॅम्पचे उद्घाटन वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन, इनरव्हील, रोटरॅक्ट, होमिओपॅथी मेडिकल यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवर कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉ. वैशाली शिरोडकर, सिंधुदुर्ग रोटरी असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, वेंगुर्ला मिडटाऊन प्रेसिडेंट प्रा. सदाशिव भेंडवडे, वेंगुर्ले इनरव्हीलच्या डॉ, पुजा कर्पे यांनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.


यावेळी सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, ट्रेझरर नितीन कुलकर्णी, संजय पुनाळेकर, प्रा. आनंद बांदेकर, प्रा. वसंत पाटोळे, सुनिल रेडकर, पंकज शिरसाट, नगरसेवक विधाता सावंत, इनरव्हील पास्ट प्रेसिडेंट गौरी मराठे, साहिली निनावे, प्रितेश लाड, सर्जिल कर्जीकर, अनिकेत निब्रे, सलोनी मजीठिया, रागिणी मौर्य, रोटरॅक्ट क्लब व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज टिम, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे मॅमो टेक्नीशियन शितल गावडे, ब्रदर बाळकृष्ण पाटील, सिस्टर एलिना कार्डोज, सोबिना लोबो, सुनिल शिंदे आदी उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यातील जनतेने या होप एक्सप्रेस मोफत सेवेचा लाभ घेत रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनच्या या आरोग्य सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले. सर्व उपस्थितांचे सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

Related Stories

ज्येष्ठ साहित्यिका उषा भागवत यांचे निधन

NIKHIL_N

महाडमध्ये एसटी चालकाचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

Patil_p

चाकरमान्यांनी सोबत रेशनकार्ड आणावे!

NIKHIL_N

तेरेखोल नदीच्या पाण्याने बांदा-दाणोली मार्ग पाण्याखाली

Anuja Kudatarkar

चिपळुणातील लोककला महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

Patil_p

शंभरच्या पाच हजार बनावट नोटा सापडल्या

NIKHIL_N