Tarun Bharat

वेंगुर्ले तालुका वकील संघटनेतर्फे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांचा सत्कार

Advertisements

वेंगुर्ले / वार्ताहर:

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांचा वेंगुर्ले तालुका वकील संघटनेतर्फे वेंगुर्ले तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. जी. जी. टांककर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी येथील वेंगुर्ले दिवाणी न्यायालय येथे हा सत्कार कार्यक्रम पार पडला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र रावराणे, कुडाळ तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. अमोल सामंत, अँड. गोडकर, अॅड. सूर्यकांत खानोलकर अॅड. विवेक मांडकुळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी यावेळी बोलताना अॅड देसाई म्हणाले की, आपण सर्वांनी माझ्यावर टाकलेला विश्वास पुढील काळात निश्चित सार्थकी लावण्याचा प्रयत्न करणार असून तालुका व जिल्हा कोर्टाच्या ज्या समस्या आहेत, त्या विचारात घेऊन सोडवल्या जातील. असे सांगितले यावेळी अॅड दिनकर वडर, अॅड प्रकाश बोवलेकर, अॅड सुषमा प्रभूखानोलकर, अॅड तेजश्री कांबळी, अॅड किरण पराडकर, अॅड मनीष सातार्डेकर, अॅड अक्षदा राऊळ, अॅड श्रद्धा बाविस्कर, अॅड प्रथमेश नाईक, अॅड तेजश्री झांटये, अॅड श्रद्धा राऊळ, अॅड धनंजय झांटये, अॅड पूनम नाईक, अॅड शुभांगी सडवेलकर, अॅड श्रीकृष्ण ओगले, अॅड प्रसाद सावंत, अॅड योगेंद्र फटनाईक आदी वकील उपस्थित होते.

Related Stories

दर्ग्यावर भगवे झेंडे लावल्याने तणाव

Patil_p

जि.प.अध्यक्षांच्या आरोग्य केंद्रांना भेटी

NIKHIL_N

डॉ. सारंग यांची बदली रद्द न केल्यास आंदोलन- सरपंच सेवा संघटनेचा इशारा

Ganeshprasad Gogate

लांजात ‘सोशल डिस्टंन्सिग’चे उल्लंघन

Patil_p

ड्रग्जच्या नशेत परदेशी पर्यटक सावंतवाडीत ताब्यात

Ganeshprasad Gogate

जिह्यात कोरोनाचे तब्बल 23 नवे रूग्ण

Patil_p
error: Content is protected !!