Tarun Bharat

वेंगुर्ले तालुक्यात लाखाची हानी

अनेक ठिकाणी झाडे कोसळली, वीज वाहिन्या तुटल्या

वार्ताहर / वेंगुर्ले:

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्मयात वादळीवाऱयासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱयाने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच काही ठिकाणी झाडे पडून हानी झाली आहे. 1 ते 3 जून या कालावधीत 133.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे वेंगुर्ले तालुक्मयात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली. मोठमोठय़ा लाटाही सुमारे 500 ते 600 मीटर भागातून फेसाळत येत किनाऱयाला येऊन धडकत होत्या. सागरेश्वर किनारी धोक्मयाचा लाल बावटा पर्यटक समुद्रात न जाण्यासाठी सतर्कता म्हणून लावण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी व मध्यरात्री पाऊस आणि सोसाटय़ाचा वारा यामुळे तालुक्मयात ठिकठिकाणी झाडे पडली. तसेच घरावरील पत्रे उडून गेले.

2 जूनला रात्रीच्या सुमारास भेंडमळा येथील कमलाकर शांताराम नवार यांची केळीची झाडे वाऱयाने पडून नुकसान झाले. आडेली-गावठणवाडी येथील धोंडू लाडू धर्णे यांच्या घरावर रात्री 11.45 वाजता आंब्याचे झाड पडून 44 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. धोंडू धर्णे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने वासे, 500 कौले तुटली. तसेच भिंतीलाही तडे गेले आहेत. बुधवारी सकाळी सरपंच समिधप् कुडाळकर, ग्रामसेवक मधुकर घाडी, पोलीस पाटील संजना होडावडेकर, राजू सामंत, भाई पेडणेकर आदींनी नुकसानीची पाहणी केली. तलाठी चारुशीला वेतोरकर यांनी पंचनामा केला.

याच दिवशी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले बंदरानजीक असलेल्या उद्योजक पुष्कराज कोले यांच्या मालकीच्या ‘सागर सरिता’ हॉटेलचे पत्रे वादळी वाऱयाने उडून दहा हजाराचे नुकसान झाले. याबाबतची माहिती हॉटेलचे व्यवस्थापक रामदास राऊळ यांनी नैसर्गिक आपत्ती केंद्रात नोंदविली. तर बुधवारी सकाळी मातोंड येथील नारायण मेस्त्राr यांच्या घरावर झाड पडून 15 हजारांचे नुकसान झाले. वजराट येथील गोपाळकृष्ण गावडे यांच्या घरावर झाडाची फांदी पडल्याने 4 हजारांचे, आरवली येथील सुरेश बापू शेरटे यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे 23 हजार रुपयांचे नुकसान झाले. पहाटे 4 वाजता दाभोली गावातील मांजरेकवाडी व मोबारवाडी येथे जाणाऱया रस्त्यावर मोठे झाड पडल्याने विद्युत वाहिन्या तुटून पडल्या. एकूण एक लाख दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद तहसीलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्षात झाली आहे.

Related Stories

दुर्गेवाडीत 50 हजाराचा लाकूड साठा जप्त

Patil_p

‘टीईटी’साठी जिल्हय़ात 2779 उमेदवारांची परीक्षेसाठी नोंदणी

Patil_p

दापोलीतील 15 डिसेंबरला होणारी ग्रा. पं. सरपंच आरक्षण सोडत स्थगित

Archana Banage

भालावल येथे आठवडय़ात पाच माकडे मृत

NIKHIL_N

उपजिल्हा रुग्णालयात औषधनिर्माण अधिकारी दोन दिवसांकरिता उपलब्ध

Anuja Kudatarkar

शिवसैनिकांनी निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला हाणले चप्पल

Archana Banage