Tarun Bharat

वेंगुर्ले राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे नवाबाग येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

147 जणांनी घेतला लाभ

वेंगुर्ले /वार्ताहर-

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट डॉक्टर सेल यांच्यावतीने पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदत व औषध उपचार हा कार्यक्रम पी.डब्ल्यू.डी. एम. एस. डी. मुंबई यांच्या सौजन्याने वेंगुर्ले येथील उभादांडा-नवाबाग शाळेमध्ये राबविण्यात आला. या आरोग्य शिबिरात 147 ग्रामस्थांनी लाभ घेतला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक नितीन कुबल, राष्ट्रवादीचे पदाधिकारी बावतीस डिसोजा, सुभाष तांडेल, अर्पणा तांडेल आदींचा समावेश होता.


यावेळी डॉ. राजेश बोवलेकर, डॉ. समृध्दी देसाई, डॉ. आकाश घाडी, डॉ. प्रसाद प्रभू-साळगावकर, डॉ. रक्षंदा घाडी, डॉ. शामल मांजरेकर, डॉ. दत्तप्रसाद पवार यांनी वैद्यकीय तपासणी केली. तसेच मोफत औषधांचे वाटप केले. याप्रसंगी उपस्थितात शाळेचे सहाय्यक शिक्षक रामा पोळजी, परेश मांजरेकर, परेश नांदोसकर, देवसू राऊळ, अंकुर कोंडस्कर, उमेश केनवडेकर, उन्नती खांडेकर, सोनाली कोकरे, मच्छीमार नेते वसंत तांडेल यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे नवाबाग प्राथमिक शाळेत राबविण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार याबाबत नवाबाग ग्रामस्थांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आभार मानले. तर या उपक्रमासाठी नवाबाग शाळेचा सभागृह देऊन सहकार्य करणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभाराचे काम डॉ. संजीव लिंगवत यांनी पाहिले.

Related Stories

चिपळुणात वृद्धेची सोनसाखळी चोरीस

Patil_p

एका माध्यमाच्या ‘सिक्रेट’ शाळेतून विद्यार्थी पालकांवर दबाव

Patil_p

प्रसिद्ध संवादिनी वादक राजन सातार्डेकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

कोंडअसुर्डे ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना योध्दांचा सन्मान

Patil_p

दारिस्तेचा पिंटू बनला ‘लखपती’

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्हय़ात आणखी आठ दिवस कडक लॉकडाऊन

Patil_p