Tarun Bharat

वेंगुर्लेतील रस्ते वाहतुक योग्य करा- शिवसेना

Advertisements

वेंगुर्ले/वार्ताहर-

वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असून येत्या चार दिवसांत वहातुकीस सुयोग्य करा. तसे न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा ईशारा वेंगुर्ले शहर शिवसेनेने दिला आहे.


वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यापुढे अशा खड्ड्यामुळे जर कोणताही अपघात घडून दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी वेंगुर्ले नगरपरिषद जबाबदार राहील. त्यामुळे तरी हे खड्डे पावसाळी डांबराने बुजवण्यात यावेत येत्या चार दिवसात याबाबतची कार्यवाही न झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल. अशा स्वरूपातील लेखी निवेदन वेंगुर्ले शिवसेनेचे शहर प्रमुख अजित राऊळ यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाँ. अमितकुमार सोंडगे यांना सादर केले आहे.


सदर निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सादर करतेवेळी शिवसेनेचे पदाधिकारी वेंगुर्ले तालुका युवा सेनेचे प्रमुख पंकज शिरसाट, शहर सेना समन्वयक विवेक आरोलकर, मिलिंद डिसोजा, दादा सारंग, वैभव फटजी, सुयोग चेंदवणकर, वेदांत पेडणेकर आदी उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेंगुर्लेतील उपअभियंता यांनाही सादर करण्यात आले आहे.

Related Stories

दापोलीत महाआघाडी, मंडणगडात सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती!

Patil_p

प्राथमिक शिक्षक विनंती बदल्यांना मुहूर्त मिळण्याची शक्यता

Patil_p

रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या ‘रिजनल प्लॅन’साठी तीन-चार वर्षे लागणार?

Patil_p

हर्णे बंदराला लवकरच अत्याधुनिक स्वरूप!

Omkar B

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना गोळवलीत अटक

Patil_p

वेंगुर्लेतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी

Rohan_P
error: Content is protected !!