Tarun Bharat

वेंगुर्ल्यातील कामांवर प्रशासनाचे दुर्लक्ष!

ठेकेदाराकडून बालकामगारांची पिळवणूक : माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांचा आरोप

वार्ताहर / वेंगुर्ले:

वेंगुर्ले नगर परिषद हद्दीतील शेखर सामंत यांचे घर ते कुळाचे मंदिर याभागातील पाणंद रस्ता व गटाराचे काम करण्यासाठी एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. सदरचे काम कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बंद असताना ही ते काम पूर्ण करून घेण्यासाठी संबधित ठेकेदारांस मुख्याधिकारी यांनी बोलावून घेत काम सुरू करण्यास सांगितले. कामावर दर्जाबाबत न. प.च्या बांधकाम निरीक्षक लक्ष देत नाही. तसेच ठेकेदार बालमजुरांना 100 रुपये मजुरी देऊन काम करून घेतल्याचे संदेश निकम यांनी स्पष्ट केले.

या बाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संदेश निकम व नगरसेविका सुमन निकम यांनी नगर परिषदेच्या बांधकाम निरीक्षकांकडे त्या कामाच्या ठिकाणी बालकामगार वावरत असल्याची तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यांत आला. तसेच या बांधकामांवर दरदिवशी पाणी मारले जात नाही. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून प्रशासन बालकामकारांना अशा प्रकारची कामे करण्यास प्रोत्साहन देत असेल तर नगर परिषद प्रशासनाचे प्रमुख जबाबदार अधिकारी मुख्याधिकाऱयांवर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा स्विकृत नगरसेवक संदेश निकम व नरसेविका सुमन निकम यांनी केली आहे.

Related Stories

रत्नागिरी : प्रेक्षकाविना चित्रपटगृहे ओस

Archana Banage

रत्नागिरीत येथे होणार तात्पुरते कारागृह

Archana Banage

पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य, केरोसीन

NIKHIL_N

पहिल्या दिवशी केवळ 226 प्रवासी

NIKHIL_N

‘माधवा, अण्णा गेले…’

NIKHIL_N

फोंडाघाट चेकपोस्टवर स्थानिक कर्मचारी ठेवा!

NIKHIL_N