Tarun Bharat

वेणुग्राम सायकल क्लबची सायकल फेरी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या 70 सायकलपटूंनी 25 कि. मी.चे अंतर पूर्ण करून क्लबचा चौथा वर्धापन दिन साजरा केला. क्लबच्या 70 सभासदांनी सकाळी 6.30 वाजता सायकल फेरीला सुरूवात केली. तेथून वडगाव, शहापूर, गोवावेस, कॅम्प, हिंडलगा गणपती, हनुमान नगर, चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, गोगटे सर्कल मार्गे टिळकवाडीतील केएलएस स्कूलच्या आवारात या फेरीची सांगता झाली.

यावेळी वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सभासदांनी गतवषी झालेल्या विविध स्पर्धांतून केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सायकल क्लबचे चेअरमन संतोष शानभाग, सचिव सतीश पाटील, सचिन अष्टेकर, महेश चौगुले, अरूण पाटील, राजू नायक, अभिजित, खंडोबा कुलकर्णी, सारिका नाईक, रामनाथ सडेकर आदी सभासद उपस्थित होते.

Related Stories

आज बारावीचा निकाल

Amit Kulkarni

विमानतळ सुरक्षेसाठी कुलींगपीटची निर्मिती

Amit Kulkarni

लोकमान्यतर्फे आज रक्तदान शिबिर-सांस्कृतिक कार्यक्रम

Patil_p

जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ

Amit Kulkarni

इमारत बांधकाम परवाना प्रक्रिया रखडली

Omkar B

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱयामुळे भारताचे आर्थिक नुकसान – सीताराम येचुरी यांचा दावा

tarunbharat