Tarun Bharat

वेतन थकबाकीच्या प्रश्नावर एमपीटीच्या कामगार संघटनेकडून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर

प्रतिनिधी /  वास्को

गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱयांनी बुधवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बंदरातील कामगारांच्या वेतन थकबाकीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर तसेच नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांची भेट घेऊन थकबाकीच्या प्रश्नावर त्यांना निवेदन सादर केले होते.

मुरगाव बंदरातील एमपीटीच्या कामगारांची व त्यांच्या निवृत्ती वेतनधारकांची वेतन थकबाकी मागच्या तीन वर्षांपासून मिळालेली नाही. यासंबंधी गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेने एमपीटी व्यवस्थापनाकडे सतत पाठपुरावा केलेला आहे. आता त्यांनी या प्रश्नी राजकीय नेत्यांनीही लक्ष घालावे अशी मागणी केलेली आहे. गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गावडे यांनी व त्यांच्या पदाधिकाऱयांनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर केले. 

Related Stories

पुढील गणेश चतुर्थीपूर्वी प्रतिमूर्ती अडीचशे रु. अनुदान

Amit Kulkarni

भ्रष्टाचाराविरोधी लढा स्वतःपासूनच!

Amit Kulkarni

कार्निव्हलसाठी मंडपात 50 टक्के प्रेक्षकांना असणार प्रवेश

Amit Kulkarni

मेळावलीत आयआयटी नकोच

Omkar B

कडव्या झुंजीनंतर जमशेदपूरचा बेंगलोरवर 3-2 असा विजय

Amit Kulkarni

यंदा काचांपासून बनवला संभाजीनगरचा राजा, दि. 15 पासून विविध कार्यक्रम

Amit Kulkarni