Tarun Bharat

वेतवडे म्हैस चोरीप्रकरणी दोन आरोपींना अटक

Advertisements

म्हासुर्ली/प्रतिनिधी

धामणी खोऱ्यातील वेतवडे पैकी खामणेवाडी (ता.पन्हाळा) येथील विलास शंकर दळवी यांच्या मालकीच्या चोरीस गेलेल्या म्हैशी चोरी प्रकरणी कळे पोलिसांनी प्रशांत विलास कांबळे रा.सुळे, व दिनकर नानू कांबळे रा.कोदवडे (ता.पन्हाळा) या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसाची पोलिस कोठडी मिळालीी आहे.

सदर चोरी प्रकरणी कळे पोलिस तपास करत असताना साक्षीदार महेश सरदार कांबळे रा.वेतवडे व हमीद अल्लाबक्ष बेपारी या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीस गेलेली म्हैस दोन दिवसापूर्वी ताब्यात घेण्यात आली होती. तसेच पुढील तपासामध्ये प्रशांत विलास कांबळे रा. सुळे व दिनकर नानू कांबळे रा.कोदवडे या दोघांनी म्हैस चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र कळे पोलिसांनी कसून शोध घेऊन दोघांना ताब्यात घेत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती विनोद खुळपे यांनी त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या सूचनेनुसार पो.हे.कॉ एस. व्ही. पाटील, पोलीस नाईक सरदार भोसले यांनी तपास करत आरोपींना पकडण्यात यश मिळविले.

Related Stories

राधानगरी नगरपंचायत व्हावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन

Abhijeet Shinde

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाकडून अवाहन

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : हॉकी स्टेडियमचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा – खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोडोलीतील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी

Abhijeet Shinde

कसबा सांगावात खुटवडा वेल खाल्याने आठ शेळ्यांचा मृत्यु

Abhijeet Shinde

उदगावात रास्ता रोको

Abhijeet Shinde
error: Content is protected !!