Tarun Bharat

वेफोरायझरच्या 125 यंत्रांचे निलजी येथे वितरण

Advertisements

बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनापासून संरक्षण मिळवायचे असेल तर वाफ घेणे हा सर्वात मोठा पर्याय आहे. वाफ घेतल्यामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याचे प्रमाण कमी होते. कोणताही रोगजंतू असला तरी त्याचा नाश होऊ शकतो. त्यामुळे निलजी येथील ब्रम्हलिंग गल्लीतील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळातर्फे गल्लीतील प्रत्येक कुटुंबाला वेफोरायझर यंत्राचे वितरण करण्यात आले.

ग्रामीण भागामध्ये नेहमीच आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. नाकातून व तोंडातून वाफ घेण्यासाठी जुन्या पद्धतीचा अवलंब केला जातो. एखाद्या भांडय़ामध्ये पाणी उकळून त्यानंतर वाफ घेतली जाते. मात्र, आता आधुनिक पद्धतीने वाफ घेण्यासाठी बाजारपेठेमध्ये यंत्रे उपलब्ध झाली आहेत. मात्र, ते साऱयांनाच खरेदी करणे अशक्मय असल्यामुळे या गणेश मंडळाने गल्लीतील प्रत्येक कुटुंबाला वेफोरायझर यंत्र दिले आहे.

यावेळी ऍड. लक्ष्मण पाटील, ह.भ.प. गोविंद मोदगेकर, दीपक मोदगेकर, जायाप्पा मोदगेकर, नारायण अक्षीमनी, अमोल अक्षीमनी, विनायक कोटीचे, महेश अक्षीमनी, रवी मोदगेकर, राकेश मोदगेकर, अमोल अक्षीमनी, अजित प्रभू, अथर्व मोदगेकर, गणेश मोदगेकर यांच्यासह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

म. ए समितीच्या वतीने जागृती दिंडीच्या पत्रकाचे अनावरण

Nilkanth Sonar

शेततळय़ात पडून 4 बालकांचा मृत्यू

Patil_p

कोरोनाची लक्षणे आढळल्याने आमदार बेनके क्वारंटाईनमध्ये

Patil_p

घरांसाठी मंजूर झालेली उर्वरित रक्कम तातडीने द्या

Amit Kulkarni

सागर शिक्षण महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Amit Kulkarni

माळमारूती- एक्स्ट्रीम यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni
error: Content is protected !!