Tarun Bharat

वेबसीरीजसाठी कथानकाची निवड महत्त्वाची : स्वप्निल जोशी

Advertisements

कायमच आपले वेगळेपण जपणारा अभिनेता स्वप्नील जोशी अनेक हिट चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेबमालिकेत दिसणार आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या जीसिम्सने केली असून पहिल्यांदाच वेबसीरिज सेगमेंटकरिता भागीदारी करण्यात आली. ही वेबसीरिज ओव्हर-द-टॉप (ओटीटी)वर प्रदर्शित होईल. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्या मुख्य भूमिका या सीरिजमध्ये असणार आहेत. दोन्ही कलाकारांची ही अशाप्रकारची पहिली वेबसीरिज आहे. ही मालिका सुहास शिरवळकर यांच्या समान नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. सध्या ही वेबसीरिज एमएक्स प्लेयर या क्षेत्रातील ओटीटी मंचावर उपलब्ध आहे. स्वप्नील जोशी म्हणाला की, “वेबसीरिजमध्ये पहिले पाऊल टाकताना कथानकाची निवड माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. समांतर ही मला आवडणाऱया कादंबऱयांपैकी एक असून तिचे लिखाण सुहास शिरवळकर यांनी केले आहे. काही वर्षापूर्वी शिरवळकर यांच्या साहित्यावर आधारित ‘दुनियादारी’मध्ये माझी प्रमुख भूमिका होती. ते माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. ते धाडसी लेखक आहेत. समांतर एक अत्यंत चांगली दृश्य कलाकृती ठरणार आहे. मी समांतरचा भाग असल्याचा तसेच मला शिरवळकर यांच्या नावासोबत जोडण्याची संधी लाभली म्हणून आनंद वाटतो. दुनियादारीनंतरची ही दुसरी संधी आहे. स्वप्नील पुढे म्हणाला की, सतीश या पुस्तकाने भारावला. या प्रकल्पासाठी तोच एक सशक्त दिग्दर्शक आहे. मी आणि सतीश आणखी एका प्रकल्पावर एकत्र काम करत आहोत. या अद्वितीय कथेवर वेबसीरिजची निर्मिती करण्यात जीसिम्सने मोलाची भूमिका बजावली. अतिशय दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठी संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञानी मोठी मेहनत घेतली आहे. मी यामध्ये कुमार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी आजवर बजावलेल्या भूमिकांहून ही व्यक्तिरेखा निराळी ठरेल. एक अभिनेता म्हणून हे माझ्यासाठी आव्हान होते. प्रेक्षकांना ही वेबसीरिज नक्कीच आवडेल. हा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल याविषयी मला खात्री वाटते.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये वाचन सुरु आहे : गिरीश ओक

Patil_p

12 व्या मजल्यावरून कोसळली, चालकाच्या हातात विसावली

Amit Kulkarni

दिलदार माणूस : भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला सोनू सूदने दिला मदतीचा हात

Tousif Mujawar

Kantara : कंतारा स्टार ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन

Abhijeet Khandekar

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन

Tousif Mujawar

‘बॅक टू स्कूल’

Patil_p
error: Content is protected !!