Tarun Bharat

वेरेत सर्वधर्मियांना शवपेटिका

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

कोविड किंवा अन्य कारणाने एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्यांचे नातेवाईक परदेशात किंवा बाहेरगावी राहतात अशावेळी मृतदेह ठेवण्यासाठी समस्या निर्माण होते. सर्वांनाच गोवा वैद्यकीय इस्पितळात जाऊन मृतदेह ठेवणे शक्य नव्हते. यासाठी रेईश मागूस पंचायत मंडळाने सर्वधर्मियांतील लोकांसाठी एक वातानुकुलीत शवपेटिका प्रदान करण्यात आल्याची माहिती सरपंच केदार नाईक यांनी दिली.

यावेळी सरपंच केदार नाईक, उपसरपंच सुश्मिता पेडणेकर, पंच सुभाष पेडणेकर, वीरेंद्र शिरोडकर, सूरज चोडणकर, राजेश भोसले, सिया नागवेकर, फेलिस्क रॉड्रिगीस, दिपक दाभोळकर, बशीर शेख, फादर ओर्लांड मास्करेन्हस तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शवपेटिका रेईश मागूस पंचायत क्षेत्राच्या लोकांसाठी असून एका शवपेटिकेची किंमत एक लाख साठ हजार आहे. आवश्यकता भासेल त्यावेळी लोकांनी समाज प्रमुखांकडून ती घ्यावी असे आवाहन सुभाष पेडणेकर यांनी केले. त्यानंतर हिंदूंसाठी दिपक दाभोळकर, मुस्लिमांसाठी बशीर शेख आणि ख्रिश्चनांसाठी फादर अर्लांड मास्करेन्हस यांच्याकडे शवपेटिका सरपंच केदार नाईक यांनी प्रदान केल्या.

Related Stories

मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि जीएमसीचे डीन यांनी राजीनामा द्यावा

Amit Kulkarni

फातोडर्य़ात आज शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशाची लढत ब्लास्टर्सशी

Amit Kulkarni

इंद्रियावर ताबा ठेवल्याने जीवनयात्रा सफल होते

Amit Kulkarni

चेन्नईन-केरळ ब्लास्टर्स लढत 1-1 बरोबरीत

Amit Kulkarni

कोलवा येथील सिल्व्हर सँड हॉटेलवरील कारवाई लांबणीवर

Amit Kulkarni

विदर्भ-मराठवाड्यात निवडणूक घ्या. उर्वरित पावसाळ्यानंतर

Rahul Gadkar
error: Content is protected !!