Tarun Bharat

वेरोडा येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थानचा आज वार्षीक पिंडीकोत्सव

‘स्वरसंवादिनी’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी /मडगाव

वेरोडा -कुंकळी येथील श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थानच्या वार्षीक पिंडीकोत्सव आज 12 मार्च रोजी विविध धार्मीक कार्यक्रमाने साजरा होणार असून संध्याकाळी 7 वाजता ‘स्वरसंवादिनी’ या भाव व भक्तीप्रधान संगिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात पुणे येथील सुप्रसिद्ध गायिका संज्यौती जगदाळे यांचे गायन असून गोमंतकातील प्रतिथयश संगितकार व तबलापटू यतिन तळावलीकर, धनराज मडकईकर (हार्मोनियम) विष्णु शिरोडकर (सिंथेसायझर), किशोर तेली (पखवाज), ओंकार च्यारी (ताल वाद्य) साथसंगत करणार आहे. सर्व भाविकानी तसेच संगीतप्रेमीनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री शांतादुर्गा वेर्डेकरिण देवस्थान समितीचे अध्यक्ष गौरीश फडते देसाई यांनी आवाहन केले आहे.

Related Stories

दमण पोलीस कोलव्यात

Patil_p

ओल्ड गोवा पोलिसांचा पराक्रम

Amit Kulkarni

एलआयसी हाऊसिंगला कोटय़वधींचा गंडा

Amit Kulkarni

बेळगावमधून लिव्हर सुरक्षितपणे पोहोचले बेंगळूरला

Amit Kulkarni

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पदाचा घेतला ताबा

Amit Kulkarni

2500 मतपत्रिका अवैध ठरवून नाकारण्याचा प्रकार

Amit Kulkarni