Tarun Bharat

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱयांच्या निदर्शनात पोलिसांचा हस्तक्षेप

प्रतिनिधी / वास्को

कोरोनाचे संक्रमण वाढलेले असतानाही गोव्यात काही ठिकाणी सरकार व इतरांविरूध्द एकत्र येऊन धरणे निदर्शने करण्याचे प्रकार वाढत आहेत. वास्कोत सोमवारी बरेच मुस्लीम बांधव एका घटनेच्या निषेधार्थ निदर्शनांसाठी एकत्र आले होते. दहावी व बारावीची परीक्षा नको म्हणूनही काही विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांनी आपला कार्यक्रम यशस्वी केला. मात्र, वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या कर्मचाऱयांना व्यवस्थापनाविरोधात हाती घेतलेली निदर्शने पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आवरती घ्यावी लागली. वेर्णाचे पोलीस निरीक्षक जाकीस शेरीफ यांनी ही कारवाई केली.

वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील इंडोको रेमीडीज या औषध निर्मिती कंपनीतील काही कर्मचारी व व्यवस्थापनामध्ये वाद निर्माण झालेला आहे. या वादातूनच व्यवस्थापनाच्या निषेधार्थ या कर्मचाऱयांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. वेर्णा व जवळपासच्याच भागात राहणाऱया या कर्मचाऱयांनी सकाळी साडे सहाच्या सुमारास निदर्शनांना प्रारंभ केला होता. मात्र, वसाहतीत वर्दळ वाढताच ही माहिती पोलिसांच्या कानी पडली. पोलिसांना या निदर्शनांविषयी कोणतीही आगाऊ सुचना नव्हती. शिवाय कोरोना संक्रमणाचा धोका वाढल्याने निदर्शनांसारखा प्रकार रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक जाकीस शेरीफ इतर पोलिसांच्या तुकडीसह घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी कर्मचाऱयांना सद्यस्थितीची कल्पना दिली व सकाळी साडे दहाच्या सुमारास ही निदर्शने आवरती घेण्यास कर्मचाऱयांना भाग पाडले. भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखालील जवळपास 75 कर्मचारी व्यवस्थानाविरूध्द घोषणाबाजी करून निदर्शने करीत होते.

Related Stories

कोरोना रुग्णांचा आकडा 490

Omkar B

‘गुगल पे’ वरून लाच घेणाऱ्या फोंडा पोलिसांना निलंबित करा

Patil_p

निरीक्षक कपील नाईक यांची त्वरीत बदली करा

Amit Kulkarni

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णांकृती पुतळय़ाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Amit Kulkarni

राज्यात जमीन रुपांतरणाचा सपाटा

Patil_p

भाजप राज्य कार्यकारिणीत तीन नेत्यांचा समावेश

Amit Kulkarni