Tarun Bharat

वेर्णा महामार्गावरील अपघातात कारचालक महिला जागीच ठार

Advertisements

प्रतिनिधी/  वास्को

वेर्णातील महामार्गावर झालेल्या अपघातात कारचालक महिला जागीच ठार झाली. या कारमधील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. मयत महिलेचे नाव रेश्मा ऊर्फ दिक्षा दामोदर नाईक(39) असे असून ती कुडचडे काकोडा येथील रहिवासी आहे.

वेर्णा औद्योगिक वसाहतीसमोरील महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास हा अपघात घडला. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत महिला जीए 05 एफ 0871 क्रमांकाची मारूती आल्टो कार चालवत होती. या कारमध्ये अन्य दोघे जण होते. ही कार पणजीहून मडगावच्या दिशेने जात होती. या कारने वेर्णा महामार्गावर पार्क करून ठेवलेल्या एका ट्रेलर ट्रकला(जीए 04 टी 7399) धडक दिली. ही कार थेट त्या ट्रकच्या चाकांच्या बाजूने आत घुसली. यात कारचालक महिला जागीच ठार झाली. अन्य दोघांना गंभीर जखमी अवस्थेत गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. पहाटेच्या वेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संध्याकाळी महिलेचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. वेर्णा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी-विक्री करा

Patil_p

केरी सत्तरीत पक्षी निरीक्षणातून चेतन पारोडकर यांच्या स्मृतींना उजाळा

Amit Kulkarni

कुर्टी-फोंडा येथे ट्रकच्या धडकेत क्लिनर ठार

Amit Kulkarni

विकास, रोजगारासाठी काँग्रेसला विजयी करा

Patil_p

गोवा राज्याची स्वंयपूर्णतेकडे वाटचाल- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Amit Kulkarni

वेळसाव-सेसा अकादमी प्रो. फुटबॉल स्पर्धेतील लढत अनिर्णीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!