Tarun Bharat

वेर्ला-काणका येथे महिलेला लुबाडले

प्रतिनिधी/ म्हापसा

झाडेझुडपे कापण्याचे काम आहे असे सांगून म्हापसा गांधी चौकजवळ कामासाठी उभा राहणाऱया महिलेस वेर्ला-काणका दोशीशीर या डोंगराळ भागात निर्जनस्थळी नेऊन एका अज्ञाताने तिच्या गळय़ातील सुमारे 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र व चार हजार रुपयांची रोकड लुबाडण्याची घटना गुरुवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हणजूण पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी ऍक्टीव्हा स्कूटर ताब्यात घेतली असून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ऍक्टीव्हा स्कूटरने (जीए 03 एन 4632) एक इसम या महिलेकडे आला. आसगाव येथे झाडेझुडपे कापायला हवी असे सांगून हजेरीवर त्या महिलेला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. दोशीशीर वेर्ला येथे त्याने निर्जनस्थळी गाडी नेली व त्या महिलेच्या मंगळसूत्र व पर्समधील रोख रु. चार हजार घेऊन स्कूटर तिथेच टाकून पसार झाला.

या प्रकरणी निरीक्षक सुरज गावस यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमीर तरल अधिक तपास करीत आहेत. भादंसंच्या कमल 365, 379 अन्वये हणजूण पालिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Related Stories

कविवर्य रामाणी यांची कविता लौकिक अनुभवातून

Amit Kulkarni

नियोजनबद्ध प्लंबिंग कला युवकांसाठी रोजगारांची दारे उघडणार-मंत्री गोविंद गावडे

Amit Kulkarni

समिल वळवईकर यांचा उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

टिळक मैदानावर आज हैदराबादची लढत केरळ ब्लास्टर्सशी

Amit Kulkarni

म्हापसा मासळी मार्केटमध्ये बिगर गोमंतकीय घुसल्याने वातावरण तंग

Omkar B

झुआरीनगरात ट्रक व दुचाकी अपघातात युवक ठार

Omkar B