Tarun Bharat

वेस्ट एक्सेंज सेंटर ठरले माणुसकीचा आधार

Advertisements

प्रतिनिधी/ कराड

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये देशपातळीवर प्रथम येण्याची हॅटट्रिक साधण्याचा निर्धार केलेल्या कराड नगरपालिकेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. विविध शहरांमध्ये गोरगरीब लोकांना मदतीसाठी उभारण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषदेने वेस्ट एक्स्चेंज सेंटर हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत गोरगरीब लोकांना कपडे, औषधे व इतर संसारोपयोगी साहित्याची मदत मोफत होत आहे. या उपक्रमाच्या कक्षा आणखी विस्तारण्याचे नगरपालिकेचे प्रयत्न आहेत.

कराड नगरपरिषदेसमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिरातील जागेत वेस्ट एक्स्चेंज सेंटर उभारले आहे. याठिकाणी पालिका कर्मचाऱयाची नेमणूक केली आहे. या सेंटरमध्ये वापरात नसलेले कपडे, संसारोपयोगी साहित्य, औषधे, अंथरूण-पांघरूण असे साहित्य उपलब्ध केले आहे. शहरातील नागरिकांनी त्यांच्या वापरात असलेल्या वस्तू या सेंटरला द्याव्यात. येथून शहरातील गरीब, गरजू लोकांनी तसेच परिसरातील गरजू लोकांनी येऊन आपणाला लागणाऱया वस्तू घेऊन जाव्यात, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. एक्स्चेंज सेंटर सुरू केल्यानंतर अनेक नागरिकांनी आपल्या वापरातील वस्तू या सेंटरला देऊ केल्या. त्यानंतर येथून अनेक गरजू लोक या वस्तू घेऊन गेले आहेत. वस्तू घेऊन जाताना संबंधिताची नोंदणी केली जाते.

कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरीब लोकांचे हाल झाले. त्यावेळी हे सेंटर गोरगरीब लोकांना मोठा आधार ठरले होते. अनेक लोकांनी या सेंटरमध्ये येऊन औषधे, कपडे अशा वस्तू नेल्या होत्या. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली हे वेस्ट एक्स्चेंज सेंटर माणुसकीचा खरा आधार ठरले आहे.

फूड बँकेसाठी कराडकर सरसावले

मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात कोणी उपाशी राहू नये, यासाठी फूड बँकेची संकल्पना मांडली मांडली होती. या योजनेअंतर्गत गोरगरीब लोकांना अन्न मोफत उपलब्ध उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यासाठी फ्रिज ची आवश्यकता होती मुख्याधिकायांच्या आवाहनास प्रतिसाद देत मयूर एजन्सीज, गजानन प्लॅनेट, वेणूताई चव्हाण कॉलेजच्या 1989 कॉमर्स विभागाच्या बॅच कडून फ्रिज पालिकेस भेट देण्यात आला. असे तीन फ्रीज पालिकेकडे जमा झाले आहेत. या उपक्रमास ही कराडकर यांचा हातभार लागत आहे.

error: Content is protected !!