Tarun Bharat

वैद्यकीयची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया स्थगित करा

सुपर न्युमररी, ईडब्ल्यूएस बाबत तत्काळ निर्णय घ्यावा

प्रतिनिधी / कोल्हापूर

राज्य सीईटी सेलने वैद्यकीय प्रवेश प्रक्रीयेच्या दूसऱया फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मराठा समाजाला दिलेल्या एसईबीसी आरक्षणास स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणा अभावी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. सुपर न्युमररी अथवा ईडब्ल्यूएस मधून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णय होईपर्यंत प्रवेश प्रक्रीया स्थगित करण्याची मागणी करुनही सीईटी सेलकडून प्रवेशाचा घाट घातला जात आहे. तरी मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रीयेला स्थगिती द्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे, राज्य सरकारने ईडब्ल्यूएस मधूनही मराठा विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतला. याबाबत व्यक्तिगत स्वरुपात उच्च न्यायालयात दाखल प्रकरणामध्ये ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश झाले आहेत. याच आधार घेत पात्र मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश द्यावा, याकरीता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल आहे. त्याचबरोबर प्रवेश प्रकीयेबाबत सुचविलेल्या सुपर न्युमररी, ईडब्ल्यूएस अथवा अन्य पर्यायांबाबत सरकारने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. हा निर्णय होईपर्यंत प्रवेश प्रक्रीया स्थगित अथवा प्रलंबित ठेवावी जेणेकरुन समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

नॅशनल मेडिकल कमिशनने कोरोना पार्श्वभूमीवर एमबीबीएस, बीडीएस प्रथम वर्षाचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानूसार फेबुवारी 2021मध्ये हे वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रीया थोडाकाळ लांबली तर फारसा फरक पडणार नाही. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठातील 70/30 प्रादेशिक कोटा प्रकरणाबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तर्व यासर्वबाबींचा आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता वैद्यकीय प्रवेश प्रक्रीया तत्काळ स्थगित करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.

निवेदनाची प्रत खासदार संभाजीराजे छत्रपती, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक उपसिमिती अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधान परिषद प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, डीएमईला डॉ. तात्यासाहेब लहाणे यांना देण्यात आली आहे.

Related Stories

महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

Archana Banage

कोल्हापूर : आमदार प्रकाश आबिटकर धर्मसंकटात!

Archana Banage

कोल्हापूर : कसबा सांगाव ग्रामपंचायत उपसरपंचासह सात सदस्यांनी दिले राजीनामे

Archana Banage

कोल्हापूर : कागलमध्ये कोरोनामुळे एकाच दिवशी बाप-लेकाचा मृत्यू

Archana Banage

सोलापूरमध्ये ‘चेस दि व्हायरस’ प्रभावीपणे राबवा : मुख्यमंत्री

Archana Banage

सातारा जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage