Tarun Bharat

वैद्यकीय मंत्र्यांचे उत्तर; विरोधकांचा सभात्याग

Advertisements

वैद्यकीय उपकरणे खरेदीत भ्रष्टाचार नाही : डॉ. के. सुधाकर यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण विधानसभेमध्ये राज्य सरकारने दिले आहे. यावर आक्षेप घेऊन आंदोलन छेडलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारकडून तिळाइतकीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे यासंबंधी न्यायालयीन चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे उत्तर वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिले. यावर आक्षेप घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व निजद आमदारांनी सभात्याग केला.

कोरोना संसर्ग आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीसंबंधी विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी, विरोधी पक्षाने सरकारवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यामुळे या प्रकरणासंबंधी कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस आणि निजद आमदारांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत गोंधळ घातला.

यावर उत्तर देताना मंत्री सुधाकर यांनी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांचेही सहकार्यही अपेक्षित आहे. विनाकारण सरकारवर आरोप करू नये. वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी चार समित्या नेमण्यात आल्या होत्या. चार मंत्र्यांचे टास्कफोर्स मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी नेमले होते. कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. मागणीनुसार उपकरणांच्या दरामध्ये काहीवेळा बदल झाले आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप निराधार आहे, असे सांगितले.

त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनी सरकार सत्य परिस्थिती नाकारत आहे. गैरव्यहार झाला असून देखील आरोपांचा इन्कार करत आहे, अशी टीका केली. कोरोना नियंत्रणासाठी विविध खात्यांतर्गत 4,200 कोटी रुपये खर्च केले आहेत. आणिबाणीच्या परिस्थितीमुळे काही नियमांचे पालन झाले नसेल. परंतु, कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असे सांगून त्यांनी विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेले आरोप फेटाळले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. सभागृहात गदारोळ माजल्याने कोणी बोललेले कोणालाही ऐकू येत नव्हते.

या गदारोळात विरोधी आमदारांनी सभात्याग केला.

सहा महिन्यात 28,140 व्हेंटिलेटरसह बेड उपलब्ध कोरोनाच्या संसर्गाला प्रारंभ होण्यापूर्वी राज्यात आरोग्य खात्याच्या इस्पितळांमध्ये एकूण 3,200 व्हेंटिलेटर असणाऱया बेडची सुविधा होती. तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असे 4 हजार बेड होते. मागील सहा महिन्यांमध्ये राज्यात आरोग्य खात्याच्या इस्पितळांमध्ये 19,456 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे 5 हजार बेड निर्माण करण्यात आले आहेत. अशा प्रकारची सज्जता यापूर्वीच्या 73 वर्षांमध्ये आरोग्य खात्यामध्ये करण्यात आली नव्हती. आपण यावरून कोणाला दोष देत नाही. तर वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले.

Related Stories

अखिलेश यादव यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा घेतला निर्णय

Abhijeet Shinde

पंतप्रधानांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Amit Kulkarni

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

datta jadhav

मुंबईत बाप्पांची जल्लोषात मिरवणूक

Patil_p

अर्थव्यवस्थेचा समतोल साधण्याची कसरत

Patil_p

चिनी नागरिकाचा भारतातील घोटाळा उघडकीस

Patil_p
error: Content is protected !!