Tarun Bharat

वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य

Advertisements

प्रतिनिधी / ओरोस:

जिल्हय़ात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले.   

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) सभागृहाची पाहणी शनिवारी पालकमंत्री सामंत यांनी केली. त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधि÷ाता (डीन) डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपअभियंता जोशी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, शासकीय महाविद्यालयासाठी लागणारी जागा महसूल विभागाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधि÷ात्याकडे वर्ग करावी. त्याबरोबर अधि÷ाता डॉ. मोरे यांनी शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही तातडीने करावी. प्रस्तावासाठी डॉ. मोरे यांना लागणाऱया सर्व बाबींची संबंधित यंत्रणांनी पूर्तता करावी. अधि÷ाता डॉ. मोरे यांच्या सूचनांनुसार आयटीआयमधील लागणारे हॉल वर्ग करून देण्यात यावेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱया विविध विभागांसाठी जिल्हा मुख्यालयातील इमारतीची जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभागांनी पाहणी करून तसा अहवाल तातडीने सादर करावा.

खासदार राऊत यांनी यावेळी शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी शासनस्तरावर सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना दिल्या. 

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी जागा हस्तांतरण करण्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती सादर केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधि÷ाता डॉ. मोरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबाबतची माहिती सादर केली.

Related Stories

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची मागणी

Ganeshprasad Gogate

व्ही. एन. नाबर प्रशालेचा दहावीचा निकाल 100 %

Ganeshprasad Gogate

गणेशोत्सव तयारीत अतिवृष्टीचे विघ्न

Patil_p

आंघोळ करताना विजेचा शॉक लागून संगमेश्वरात एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

रत्नागिरीत अनधिकृत टपऱया, खोके हटवले!

Patil_p

राज्य सरकारतर्फे होणार पक्षी सप्ताह

NIKHIL_N
error: Content is protected !!