Tarun Bharat

वैभवनगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 प्रतिनिधी / बेळगाव

वैभवनगर येथील तरुणाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. रमेश यल्लाप्पा गौडर वय 28 रा. वैभवनगर दुसरा क्रॉस असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रमेशची पत्नी लक्ष्मी यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. रमेश हा व्यवसायाने रिक्षाचालक होता. लॉकडाऊन काळात त्याने कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सीपीआय जावेद मुशापुरी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. सिव्हील हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

होलसेल मार्केटमध्ये आंब्यांची आवक

Amit Kulkarni

मच्छे दुहेरी खून प्रकरणाची मास्टर माईंड महिला!

Patil_p

खानापुरात होणार शिवगर्जना महानाट्या प्रयोग

Amit Kulkarni

निवृत्त लष्करी अधिकाऱयाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p

…अन् ओल्या मिरचीची झाडेच उपटून टाकली

Amit Kulkarni

दिवाळीसाठी विशेष अतिरिक्त बससेवा

Amit Kulkarni