Tarun Bharat

वैराग ग्रामपंचायत कार्यालयात रंगली दारू पार्टी

कोरोना रुग्ण सापडल्याने वैराग पूर्ण सील

वैराग/प्रतिनिधी

गेली दोन दिवसात बार्शी तालुक्यातील वैराग या गावात एक किराणा व्यापारी कोरोना ग्रस्त सापडला असून त्याच्या संपर्कात असणारे अनेक जणांचे रिपोर्ट अजून यायचे बाकी असताना वैराग ग्रामपंचायत कार्यालयात एक दारुची पार्टी रंगली आणि लागलीच त्या पार्टी चे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने बार्शी तालुक्यात आणि वैराग गावात एकच चर्चा रंगली असून साथीला घबराट ही पसरली आहे. यामुळे गाव कोमात अन प्रशासन जोमात अशीच परिस्थिती वैराग ग्रामपंचायत कार्यालयाची झाली आहे. कोरोनामुळे वैराग पूर्ण सील असताना ग्राम पंचायत कार्यालयत पार्टी रंगते कशी? हा प्रश्न नसून गावचा गाडा हाकणारे जर बेजबाबदार वागत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा हा खरा प्रश्न आहे.

वैराग ग्राम पंचायतीचा हा असंवेदनशीलतेचा खरा चेहरा या निमित्ताने दिसून आला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना प्रत्येकजण जमेल तो प्रयत्न आज करताना आपण पाहत आहोत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सोलापूर जिल्ह्यात आकडे वाढतायत कालपर्वा वैरागमध्ये म्हणजे बार्शी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आणि त्या मुळेच जिल्हाप्रशासनाकडून वैरागला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.

एकीकडे जिल्हाप्रशासन आणि तालुका प्रशासन रात्रदिवस राबत आहे आणि स्थानिक वैराग ग्राम पंचायत प्रशासनातील वैराग ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर, कार्यालयीन अधीक्षक विलास मस्के, बांधकाम अभियंता जाधव, लिपिक शेख हे वैराग ग्राम पंचायत कार्यालयात दारूच्या पार्ट्या करत असल्याचे आज समोर आले आहे आणि तसे ते पार्ट्यात रंगल्याचे व्हिडीओ आणि फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोलापूरचे पोलीस अधीक्षक बार्शी दौऱ्यावर आले असतानाच अधिकाऱ्यांना दारू, गुटखा अश्या अवैध धंद्यांवर कारवाई करा असे सांगून गेले. हे सर्व खोट ठरवत प्रतिबंधित क्षेत्रात दारू येते, पार्ट्या होतात म्हणजे स्थानिक पोलिसांच्या कामाबद्दल देखील या निमिताने प्रश्नचिन्ह निर्माण होते.

वैराग मधील नागरिकांकडून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून आणि अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांना योग्य ते शासन मिळाले पाहिजे अशी मागणी काही वैराग भागातील जाणकार मंडळी यांनी आज केली आहे. या घडलेल्या असंवेदनशील प्रकारात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे काय कारवाई करतायत याकडे जनतेचं लक्ष असणार आहे.
वैराग येथे झालेल्या प्रकाराबद्दल सोलापूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. कार्यालय सीसीटी फुटेज, व मिळालेले फोटो व व्हीडीओ यांची खातरजमा व चौकशी सुरू आहे. वरिष्ठांना त्याबाबतचा अहवाल देणार आहे. कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठांना असल्याचे चौकशी अधिकारी तथा गटविकास अधिकारी शेखर सावंत यांनी सांगितले.

Related Stories

पुणेकरांना मोठा दिलासा; सर्व दुकानं, मॉल्स सोमवारपासून रात्री 7 वाजेपर्यंत खुली राहणार

Archana Banage

कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करणार

datta jadhav

देशातील वाहनांच्या आकारमानात होणार बदल, अधिसूचना जारी

datta jadhav

कोळकीत साकारणार मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प

Patil_p

कसबा बावड्यात युवकावर पूर्ववैमस्यातून खुनी हल्ला

Archana Banage

केंद्र सरकार हिंदुस्थान झिंकमधील संपूर्ण हिस्सा विकणार

datta jadhav