Tarun Bharat

वैराग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

प्रतिनिधी / वैराग

वैराग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका इसमास डोक्यात जबर मार लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला. ही घटना वैराग ते सुर्डी जाणारे रोडवर शेळके वस्ती येथे रविवार दि.१ रोजी सायंकाळी सहा वाजणेच्या सुमारास घडला. गोवर्धन सौदागर शेळके ( वय ५० ) रा. सुर्डी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अज्ञात वाहन चालका विरोधात व बार्शी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत तालुका ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यातील मयत गोवर्धन सौदागर शेळके हे शेतातून घरी येत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात वाहन चालकाने जोराची धडक दिली.

अपघातानंतर गावातील लोकांनी मयताचा पुतण्या रघुनाथ शेळके यांना कळविल्यानंतर त्यांनी रुग्णवाहीकेमधून औषध उपचारासाठी बार्शी येथे नेत असताना उपचारापूर्वीच मयत झाले. याबाबतची फिर्याद पुतण्या रघुनाथ नागनाथ शेळके रा. सुर्डी यांनी दिले आहे. यावरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात वाहन चालक अद्याप फरार असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

सोलापूर : माघ एकादशीला संचारबंदी पण एसटी सुरळीत

Archana Banage

सोलापूर : एमआयएमतर्फे कोकणच्या पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूची गाडी रवाना

Archana Banage

कुर्डुवाडी : किराणा व्यापाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी ४ जणांना पिस्तूलासह अटक

Archana Banage

सोलापूर शहरात १५ तर ग्रामीणमध्ये ४६० नव्या कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

Archana Banage

सोलापूर : प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा 6 नोव्हेंबरपासून सुरू

Archana Banage