Tarun Bharat

वॉर्डनिहाय साईराज चषक एपीएस वॉरियर्स संघाकडे

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

समीर येळ्ळूरकर व पवन शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एपीएस वॉरियर्स संघाने अंतिम सामन्यात सिद्धकला अनगोळ संघाचा चार गडय़ानी पराभव करून पहिला साईराज वॉर्डनिहाय चषक पटकाविला. समिर येळ्ळूरकर याला सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज व मालिकावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर साईराज स्पोर्ट्स आयोजित वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेच्या  अंतिम सामन्याचे नाणेफेक उद्योजक मल्लीकार्जुन जगजंपी यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम सामना दोन डावात खेळविण्यात आला. नाणेफेक जिंकून एपीएस वॉरियर्सने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले प्रथम फलंदाजी करताना सिद्धकला अनगोळ संघाने 10 षटकात 6 बाद 92 धावा केल्या. भुषणने 2, षटकार 1 चौकारासह 28, संतोष जाधव व गणेश कंग्राळकर यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. एपीएस वॉरियर्सतर्फे समिर येळ्ळूरकरने 21 धावात 2 तर पवन शर्माने 37 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एपीएस वॉरियर्सने पहिल्या डावात सर्व बाद 164 धावांचा डोंगर उभा करीत 72 धावांची आघाडी घेतली. समिर येळ्ळूरकरने 7 षटकार, 1 चौकारासह 53, पवन शर्माने 6 षटकारासह 12 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. सिद्धकलातर्फे प्रमोद पालेकर व संतोष जाधवने 45 धावात प्रत्येकी 2 गडी बाद केले.

दुसऱया डावात सिद्धकला अनगोळ संघाने 10 षटकात 8 बाद 99 धावा केल्या. त्यामुळे 28 धावांचे आव्हान एपीएस वॉरियर्सला मिळाले. सिद्धकलातर्फे भुषणने  25, प्रशांतने 21 धावा केल्या. एपीएस वॉरियर्सतर्फे सारंग राघोचे व जोतिबा गिलबिले यांनी प्रत्येकी 23 धावात 2 गडी बाद केले. 28 धावांचे सोपे उद्दिष्ट घेवून खेळताना एपीएस वॉरियर्सने 4.1 षटकात 6 बाद 28 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. गणेश व पवन शर्मा यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. सिद्धकलातर्फे विजय धामणेकरने 2 धावात 4 गडी तर प्रशांतने 20 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बुडा चेअरमन संजय बेळगावकर, नारायण फगरे, महेश फगरे, गजानन फगरे, रोहित फगरे, भाऊ फगरे, अमर सरदेसाई, गिरीश धोंगडी, नंदू मिरजकर, दीपक सोमनाचे, शितल वेसने, विजय जाधव, संभाजी देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या एपीएस वॉरियर्स संघाला 50 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या सिद्धकला संघाला 25 हजार रूपये रोख व चषक देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज समिर येळ्ळूरकर वॉरियर्स, उत्कृष्ट गोलंदाज प्रमोद पालेकर सिद्धकला, इम्पॅक्ट खेळाडू राहुल शिंदे विराट, उत्कृष्ट झेल आकाश हणमसेठ अनगोळ स्ट्रायकर्स, उत्कृष्ट यष्टीरक्षक इम्रान शेख, उत्कृष्ट संघ क्रिकेट मास्टर्स आणि मालिकावीर समीर येळ्ळूरकर यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून सुनील पाटील कोल्हापूर, अनंत माळवी, किरण तारळेकर, मैफुज दफेदार यांनी तर स्कोअरर म्हणून कल्पेश यांनी काम पाहिले. क्रिकेटचे समालोचन मोहन वाळवेकर, आरिफ बाळेकुंद्री, मैफुज दफेदार, नासिर पठाण, उमेश मजुकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साईराज स्पोर्ट्च्या  पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

एकदाच जळाले सरण, मात्र घरच्यांचे रोजचेच मरण!

Amit Kulkarni

हिंडलगा महालक्ष्मी यात्रोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

सरकारी दूध पावडरचा काळाबाजार

Amit Kulkarni

दिवाळीत कर्नाटकात फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी

Archana Banage

जवारी बटाटा दरात 200 रुपयांनी वाढ

Patil_p

व्हिडीओग्राफर्स असोसिएशनतर्फे छायाचित्रण दिन

Patil_p