Tarun Bharat

वॉर्ड क्र. 27 मधील गटारी, नाले सफाईबाबत सूचना

नगरसेवक साळुंखेंची मनपा अधिकाऱयांशी चर्चा

प्रतिनिधी /बेळगाव

बसवेश्वर सर्कलसह परिसरात गटारी व नाल्यामध्ये कचरा साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. सफाई कर्मचारी योग्य प्रकारे तसेच नियमित सफाई करत नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांना बोलावून वॉर्ड क्रमांक 27 मधील सर्व समस्या त्यांच्या नजरेला आणून दिल्या.

वॉर्ड क्रमांक 27 मधील अनेक गटारींमध्ये कचरा साचून आहे. नाला स्वच्छ नसल्याने पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. यामुळे बऱयाच ठिकाणी दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

अनेकवेळा कळवूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी व इतर कर्मचाऱयांना बोलावून त्यांना या परिसरातील माहिती दिली आहे. तातडीने सफाई करावी, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

बसवण कुडची, रामतीर्थनगर येथे घरफोडय़ा

Patil_p

बेळगावहून बेंगळूरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग

Tousif Mujawar

वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी

Patil_p

निसर्गाची काळजी हे प्रत्येकाचे कर्तव्य

Amit Kulkarni

डॉक्टरांवरील हल्ल्याने प्रश्न सुटणार नाहीत!

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ाने द्विशतक गाठले

Patil_p