Tarun Bharat

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षणाबाबत 32 आक्षेप

महानगरपालिका वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याचा दावा : उद्या होणार सुनावणी

प्रतिनिधी / बेळगाव

नगरविकास खात्याने आरक्षण जाहीर करून हरकती मागविल्या होत्या. मात्र, महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचला असून पुढील सुनावणी दि. 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तरीदेखील शहरातून वॉर्ड आरक्षणावर 32 आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. काही नागरिकांनी वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण पूर्णपणे चुकीचे असल्याची तक्रार केली आहे.

 वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण 2018 मध्ये जाहीर करण्यात आले होते. महापालिका वॉर्डची तोडफोड करण्यात आल्याने हा वाद न्यायालयात दाखल करण्यात आला होता. सदर वॉर्ड पुनर्रचना चुकीची असल्याची तक्रार करण्यात आल्याने वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण मागे घेऊन नव्याने जाहीर करण्याचे प्रतिज्ञापत्र नगरविकास खात्याने उच्च न्यायालयात दाखल केले होते. पण या प्रतिज्ञापत्राप्रमाणे नगरविकास खात्याने वॉर्ड पुनर्रचना करण्यापूर्वीच थेट वॉर्ड आरक्षण जाहीर करून हरकती मागविल्या आहेत. आक्षेप नोंदविण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी देण्यात आला होता. बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण जाहीर करून नगरविकास खात्याने निवडणूक घेण्याच्या हालचाली चालविल्या आहेत.

मात्र, धारवाड उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून वॉर्ड पुनर्रचना करण्यापूर्वी थेट आरक्षण जाहीर करण्यात आल्याने याला आक्षेप घेण्यात आला आहे. माजी नगरसेवकांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन बेंगळूर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करावा, अशा मागणीची याचिका धारवाड उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वॉर्ड आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचनेबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे आक्षेप नोंदविले आहेत.

नव्याने पुनर्रचना करा

पंधरा दिवसांच्या कालावधीत 32 नागरिकांनी आक्षेप नोंदविले असून काही वॉर्ड आरक्षणाबाबत तक्रारी केल्या आहेत. वॉर्ड पुनर्रचना चुकीची झाल्याचा दावा करून वॉर्ड पुनर्रचना नव्याने करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी दाखल केलेल्या आक्षेपाबाबत जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

मजगाव येथील वृध्दा बेपत्ता

Tousif Mujawar

रोटे. शरद पै यांचा विशेष पुरस्काराने गौरव

Tousif Mujawar

केएलई हॉस्पिटल रोडवरील पथदीप रात्री नेहमी सुरू ठेवावार्ताहर

Omkar B

मार्केट यार्ड परिसरात गांजा विकणाऱया तरुणाला अटक

Amit Kulkarni

कर्नाटक : साखर कारखान्यांची केंद्राला कर्जाबाबतचे नियम शिथिल करण्याची विनंती

Abhijeet Khandekar

नंदिहळ्ळी परिसरात रेल्वेमार्गाचा सर्व्हे सुरू

Patil_p