मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या कसोटी क्रिकेट क्षेत्रातील निवृत्तीचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असून आणखी काही दिवस वनडे क्रिकेटमध्ये खेळण्याची शक्यता त्याने वर्तवली आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी-20 विश्व चषक स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलियाला प्राथमिक फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते. पुढील वर्षी भारतात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत त्याचप्रमाणे 2024 च्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा मनोदय त्याने व्यक्त केला.
Previous ArticleKolhapur : ‘अर्बन’मध्ये कणेरकर-शिंदे पॅनेलचीच बाजी
Next Article बॉडी शेमिंग-बाह्यरूपाचे टोमणे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.