Tarun Bharat

वॉशिंग्टन सुंदरऐवजी जयंत यादवचा समावेश

मुंबई

 भारतीय संघाचा ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी वनडे मालिकेतून बाहेर फेकला गेला असून त्याच्याऐवजी जयंत यादवचा पर्यायी खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. जयंत यादवशिवाय नवदीप सैनीला देखील मोहम्मद सिराजला पर्यायी खेळाडू या नात्याने संघात वर्णी लागली आहे. मोहम्मद सिराज अद्याप धोंडशिरेच्या दुखापतीशी झगडत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका दि. 19 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.

भारतीय वनडे संघ ः केएल राहुल (कर्णधार), जसप्रित बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.

Related Stories

‘कुलदीप मॅजिक’समोर केकेआरची त्रेधातिरपिट!

Amit Kulkarni

गुजरात जायंट्स, तामिळ थलैवाज विजयी

Patil_p

महान हॉकीपटू चरणजीत सिंग यांचे निधन

Amit Kulkarni

भारत अर्जेंटिना आज महत्त्वाचा उपांत्य सामना

Patil_p

न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ जाहीर

Patil_p

फुटबॉलपटू रॅमोस कोरोना बाधित

Patil_p