Tarun Bharat

व्यंकय्या नायडूंच्या ‘ट्विटर’ अकाउंटला पुन्हा ब्लू टिक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

मायक्रोब्लॉगिंग साईट ‘ट्विटर’ने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या वैयक्तिक हँडल्सवरील ब्लू टिक हटवली होती. मात्र, कंपनीसोबतच्या वाढत्या वादानंतर ही ब्लू टिक पुन्हा लागू करण्यात आली. 

ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह अरुण कुमार, संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी आणि इतर नेत्यांच्या वैयक्तिक हँडल्समधून ब्लू टिक काढून टाकली होती. लोकांनी यावर आक्षेप घेतला होता. वापरकर्त्यांनी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ट्विटरने पूर्वीप्रमाणेच 10 तासांच्या आत ही ब्लू टिक पूर्ववत केली.

दरम्यान, जेव्हा एखादे ट्विटर अकाउंट बऱ्याच दिवसांपासून निष्क्रिय असेल किंवा एखाद्या व्यक्तीने त्याच्या हॅन्डलचे नाव बदलल्यास ते अकाउंट अनव्हेरिफाय केले जाऊ शकते. तसेच त्या अकाऊंटची ब्लू टिक हटवली जावू शकते.

Related Stories

देशद्रोह कायद्यात परिवर्तनाचे संकेत

Patil_p

संवेदना अन् संघर्षाचे प्रतीक असलेले निवडणूक ‘चिन्ह’

Patil_p

ही तर आमदारांच्या मतदारसंघांना शिक्षा

Patil_p

प्रेमळ नदी, मला सामावून घे!

Amit Kulkarni

कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

datta jadhav

अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठीची लिंक आजपासून खुली

Archana Banage