Tarun Bharat

व्यवसायकर कायद्यांतर्गत कर भरणा ३१ मार्च पूर्वी करा- राज्य कर सहआयुक्त

Advertisements

सांगली-प्रतिनिधी

महाराष्ट्र व्यवसायकर कायदा-1975 अन्वये नावनोंदणीकृत, नोंदणीकृत असलेल्या व्यक्ती व मालक यांनी आपला व्यवसायकर 31 मार्च पुर्वी कर भरणा करणे अनिवार्य आहे. तरी सर्व नावनोंदित व नोंदणीकृत व्यक्ती व मालक यांनी कर भरणा व विवरणपत्र विहीत मुदतीत सादर करून शासनाच्या महसूल वाढीस सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर क्षेत्राचे राज्यकर सहआयुक्त (व्यवसायकर) समरजीत थोरात यांनी केले आहे.

सध्या व्यवसायकर विभागाव्दारे नोंदित व्यवसायकर दात्यांसाठी विलंब शुल्क माफी योजना आणली असून ज्या आस्थापनांची माहे डिसेंबर 2021 पर्यंतची व्यवसायकराची विवरणपत्रके प्रलंबित आहेत अशी सर्व विवरणपत्रे कोणतेही विलंब शुल्क न भरता केवळ कर व व्याज भरून. 31 मार्च पर्यंत भरता येईल. तरी सर्व व्यवसायकर नोंदणीधारक आस्थापनांनी त्यांच्या प्रलंबित कालावधीसाठीचा व्यवसायकर आणि त्यावरील व्याज भरून व्यवसायकराची विवरणपत्रके 31 मार्च पर्यंत भरून विलंब शुल्क माफीचा लाभ घ्यावा. विहित मुदतीत करभरणा व विवरणपत्र सादर न केल्यास सदर कायद्यानुसार कर, व्याज, शास्ती किंवा शुल्क यासह रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधितानी नोंद घ्यावी. त्याचबरोबर अनोंदित व्यक्ती व मालक यांनी व्यवसायकर कायद्यांतर्गत नोंदित होवून, करभरणा करावा व राष्ट्र उभारणी कार्यास सहकार्य करावे. विवरणपत्रे भरताना काही अडचणी आल्यास व्यवसायकर कार्यालयास भेट द्यावी अथवा pttechnicalissue@gmail.com या ठिकाणी मेल करावा, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

Related Stories

नोएडाचे भाजपाचे आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे सुरू करण्याचा ठाकरे सरकारचा मानस

datta jadhav

तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार का?

datta jadhav

कोल्हापूर : कोरोना ‘टेस्टिंग’साठी रूग्णांची लुट!

Archana Banage

कोल्हापूर चित्रनगरीत `संत गजानन शेगाव’चे मालिकेच्या चित्रिकरणाला प्रारंभ

Archana Banage

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

Archana Banage
error: Content is protected !!