Tarun Bharat

व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या अथवा दहा हजाराची तातडीची मदत करा

प्रतिनिधी / खंडाळा

सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. अथवा दहा हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा खंडाळ्यात झालेल्या आंदोलनात नाभिक समाजाच्यावतीने देण्यात आला.

खंडाळ्यातील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ नाभिक समाजाच्यावतीने सोशल डिस्टंसिंग पाळत शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले. दरम्यान सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. यासह अन्य मागण्यांचे निवेदन खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे यांना देण्यात आले.

त्या निवेदनात म्हटले आहे की, 23 मार्चपासून सलून व्यवसाय बंद असून समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात सूट देत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने 5 जुनला स्मरणपत्र देत व्यवसाय सुरू करणे अथवा आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती.मात्र मागणी मान्य न केल्याने राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा,तालुकास्तरावर आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, ओंकार पवार, नवनाथ शिंदे, योगेश माने, संतोष आवटे, जयवंत शिर्के, ऋषिकेश पवार, राजेंद्र माने, राजेंद्र काशीद, राजेंद्र गोरे, दत्ता देवकर तसेच खंडाळ्यासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

Related Stories

खवले मांजराची तस्करी; चौघांच्या मुसक्या आवळल्या

Patil_p

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी ठिय्या

Patil_p

सातारा : लॉकडाऊनमध्ये वाढतोय पोटदुखीचा त्रास,25 ते 50 वयोगटांना अधिक त्रास

Archana Banage

इपीएस-९५ च्या पेन्शन धारकांना अद्याप वाढ नाही : अफवावर विश्वास ठेवू नये

Archana Banage

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान पुण्याच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ला

datta jadhav

साताऱ्यात पूर्वप्राथमिक शिक्षिका, सेविका संघाचे थाळीनाद आंदोलन

datta jadhav