Tarun Bharat

व्यापारी गुपिते चोरणाऱया चिनी नागरिकाला अमेरिकेत अटक

Advertisements

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेत शुक्रवारी रात्री उशिरा एका चिनी नागरिकाला व्यापारविषयक गुपिते चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हेझाऊ हू असे या आरोपीचे नाव आहे. 34 वर्षीय हेझाऊ हा संगणकतज्ञ असून वर्क व्हिसावर त्याने अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये काम केले आहे. या कारवाईनंतर अमेरिका आणि चीनचे संबंध अधिक बिघडू शकतात असे मानले जात आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या अनेक नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

चीनला जाणाऱया एका विमानात बसण्याची तयारी करत असताना हू याला अटक करण्यात आली आहे. त्याचा बोर्डिंग पासही तयार झाला होता. हू कुठल्या कंपन्यांसाठी काम करत होता हे अद्याप समोर आलेले नाही. कार्यकक्षेबाहेरील संगणकांमधून हू याने माहिती प्राप्त केली आहे. त्याची ही कृती अवैध असल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे.

हू दोन वर्षांपूर्वी सर्वप्रथम अमेरिकेत दाखल झाला होता. त्याने स्वतःला जैवतंत्रज्ञानाचा संशोधक संबोधिले होते. परंतु त्याने अवैध मार्गाने सॉफ्टवेअर कोड तयार करत व्यापारविषयक गुपिते चोरण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळून काही संशयास्पद सामग्रीही हस्तगत झाली आहे. आरोपीने अनेकदा वर्जिनिया विद्यापीठाचा दौरा केला होता.

तणाव वाढणार

मागील महिन्यात अमेरिकेने चीनला ह्युस्टन येथील दूतावास रिकामा करण्यास सांगिते होते. याच्या प्रत्युत्तरादाखल चीनने चेंगदू येथील अमेरिकेचा दूतावास रिकामा करविला होता. चीन स्वतःच्या दूतावासांचा वापर अमेरिकेची हेरगिरी करण्यासाठी करत असल्याचा आरोप झाला होता. काही दिवसांनी एका चिनी महिलेला अटक करण्यात आली होती. हेरगिरीचे जाळे तयार करत असल्याचे तिने चौकशीत मान्य केले होते.

Related Stories

जपानमध्ये नवीन जोडप्यांना मिळणार 4.25 लाख रुपये

datta jadhav

पाकिस्तानात पारा 51 अंशांच्या पार

Patil_p

आशिया खंड : फुफ्फुसाचा कर्करोग महिलात 25 टक्के तर पुरुषात 24 टक्क्यांनी वाढला

Sumit Tambekar

सेवाक्षेत्राला फटका

Omkar B

अजबच!, सहारा वाळवंटच गोठले

Patil_p

ऑनलाइन क्लासदरम्यान मोबाईलचा स्फोट, मुलाचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!