Tarun Bharat

व्यापारी-शेतकऱयांच्या समस्यांबाबत बैठकीत चर्चा

Advertisements

प्रशासनाने समस्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा व्यापारी असोसिएशनचा इशारा

वार्ताहर/ कंग्राळी खुर्द

व्यापारी असोसिएशन रताळी, बटाटा मार्केट एपीएमसी बेळगाव यांची सार्वजनिक बैठक शाहू सोसायटीच्या सभागृहात झाली. यावेळी व्यापाऱयांच्या प्रमुख अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. रताळी, बटाटा आवक सुरू असल्यामुळे मार्केट यार्डमध्ये दरवषीप्रमाणे शेतकरी, व्यापारी, कामगार यांची गर्दी होते. यंदा कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत मार्केट यार्डमध्येही परिस्थिती थोडीशी बिकट असल्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्यादृष्टीने काळजी घेत व सरकारच्या आदेशाचे पालन करत गर्दी न करत मार्केटमध्ये शेतीमाल आणावा. शेतीमालाचा दर, वजन किंवा मालाच्या हिशेबाची पट्टी व्हॉट्सऍप व पेमेंट गुगल किंवा आर. टी. जी. एस. च्या माध्यमातून करण्यात येईल.

असाच प्रयोग आम्ही नोटाबंदीवेळी केला होता व तो यशस्वीही झाला. तसेच सहकार्य शेतकरी बंधूंनी आताही करावे. यासंबंधी चर्चा करण्यात आली.

शेतीमाल चोख आणण्याचे आवाहन

देशभर जिथे जिथे रताळी माल पाठविला जातो त्या ठिकाणी त्यांचे कामगारवर्ग व विकणारे रिटेल ग्राहक भीतीमुळे ती शहरे सोडून आपापल्या गावी गेल्यामुळे व मोठय़ा शहरात फेरीवाल्यांना माल फिरून विकण्यास मनाई असल्यामुळे त्याचा परिणाम मार्केटमध्ये रताळय़ाची मोठी आवक आल्यास व त्यामध्ये मालाचा दर्जा नसल्यास दरावर होणार आहे. त्यासाठी बारीक मुळी न घालता मालाची प्रतवारी करून आवक आणणे, पोते ओतून व्यापार होईल, चांगल्या मालाला चांगला भाव मिळेल. रताळी बटाटा मार्केटमध्ये दोन प्रमुख रस्त्यांची, पिण्याच्या पाण्याची, रस्त्यावरील पथदीपांची समस्या लवकरच दूर करू, असे आश्वासन एपीएमसीने भेट देऊन केले होते. तरी अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. त्यातच अस्वच्छतेमुळे मोकाट डुकरांचे कळप फिरताहेत. त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होऊन मुक्कामी असणाऱया कामगारवर्गाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या सर्व समस्यांकडे प्रशासनाने लवकरच लक्ष न दिल्यास व्यापारी पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

यावेळी पी. एल. कदम-पाटील, सी. व्ही. खानोलकर, हेमंत पाटील, बंडू मजुकर, गजानन घोरपडे, कृष्णा पाटील, दीपक होनगेकर यांनी आपापले विचार व्यक्त केले. असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरुचे, उपाध्यक्ष चेतन खांडेकर, खजिनदार विनायक होनगेकर, सदस्य सुधीर पाटील, सुरेश जाधव, नरसिंह पाटील, विक्रमसिंह कदम-पाटील, दत्ता पाटील तसेच बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार सचिव माणिक बी. होनगेकर यांनी केले.

Related Stories

किल्ल्याजवळील बसथांबा कोसळण्याच्या मार्गावर

Patil_p

शिवबसवनगर जोतिबा मंदिरात प्रकटदिन

Amit Kulkarni

बेळगावात ग्राहक आयुक्त न्यायालयास मंजुरी

Amit Kulkarni

जानेवारीअखेरपर्यंतची बिले जमा करणार

Amit Kulkarni

डॉ.सतीश चौलीगर यांचा किरण जाधवकडून सत्कार

Omkar B

कचऱयामुळे काँग्रेस रोड परिसर अस्वच्छ

Amit Kulkarni
error: Content is protected !!