Tarun Bharat

व्यावसायिक कोर्ससाठी इच्छुकांना ‘गेट सेट गो’

Advertisements

उच्च शिक्षण खात्याकडून पोर्टलची व्यवस्था : मुख्यमंत्री येडियुराप्पांकडून अनावरण

प्रतिनिधी / बेंगळूर

मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील सीईटी, नीट परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण खात्यातर्फे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता ‘गेट सेट गो’ या बेवपोर्टलची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदापासून जेईई परीक्षा देणाऱयांनाही या व्यवस्थेचा लाभ होणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या बेवपोर्टलचे अनावरण केले. या व्यवस्थेतून व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना अनुकूल होणार आहे. कोणत्याही राज्यातील विद्यार्थी या व्यवस्थेचा लाभ घेऊ शकतो.

विधानसौध येथे पार पडलेल्या कार्यक्रमात गेट सेट गो (get CET go) या व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी शुभारंभ केला. आतापर्यंत सीईटी, नीट परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांनाच याद्वारे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. यंदापासून जेईई परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी देखील ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सामाजिक, आर्थिक मागास विद्यार्थ्यांना अनुकूल

उच्च शिक्षण खात्याने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे सामाजिक, आर्थिक मागास असणाऱया विद्यार्थ्यांना अधिक अनुकूल होणार आहे. शिवाय समग्र अध्ययन व्यवस्था देखील उपलब्ध असणार आहे. उपमुख्यमंत्र्यांनी यासाठी केले परिश्रम कौतुकास्पद आहेत, असे उद्गारही येडियुराप्पा यांनी काढले.

वर्षभर प्रशिक्षण

याप्रसंगी ‘गेट सेट गो’विषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी कर्नाटक परीक्षा प्राधिकणाकडून येत्या शैक्षणिक वर्षापासून या व्यवस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षभर प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. आयआयटीमध्ये कर्नाटकातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्टही याद्वारे बाळगले आहे. जेईई, नीट परीक्षांमध्ये कर्नाटकातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना उत्तम रँक मिळविण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे.

आवश्यक अध्ययन सामुग्री उपलब्ध…

अध्ययन, सुधारणा आणि परीक्षा या संकल्पनेतून गेट सेट गो कोचिंग व्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये सीईटी, नीट आणि जेईई परीक्षा देणाऱयांना आवश्यक अध्ययन सामुग्री तसेच व्हिडीओ, पाठय़ सारांश, संवादात्मक परीक्षा असतील. संपूर्ण देशात विद्यार्थ्यांसाठी अशी व्यवस्था असणारे कर्नाटक पहिले राज्य आहे, असेही उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गेट सेट गो ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुलभपणे प्रवेश मिळविता येणार आहे. कर्नाटकासह सीईटी देण्यास इच्छुक असणाऱया देशातील कोणत्याही विद्यार्थ्याला आपली माहिती नमूद करून नोंदणी करता येणार आहे. वेबसाईट, युटय़ूब किंवा गेट सेट गो ऍपद्वारेही प्रशिक्षण घेण्याची सुविधा आहे. सदर ऍप ऍन्ड्रॉईड, आयओएसमध्येही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना getcetgo.in या बेव पोर्टल, गुगल प्ले स्टोअरवर माहिती मिळविता येणार आहे. आपली माहिती नमूद करून नोंदणीही करता येणार आहे.

Related Stories

कर्नाटक: अनुदान परताव्याच्या तपासावर विरोधी पक्ष ठाम

Abhijeet Shinde

चार महिन्यांपासून शाळा बंद, शिक्षणतज्ञांना शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती

Rohan_P

पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय

Patil_p

बेंगळूर: कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे बीबीएमपीचे आदेश

Abhijeet Shinde

कर्नाटकात पहिल्या दिवशी ६२ टक्के लाभार्थ्यांना लसीकरण

Abhijeet Shinde

ब्लॅक फंगसवरील उपचारासंबंधी मार्गसूची लवकरच

Amit Kulkarni
error: Content is protected !!