Tarun Bharat

व्यावसायिक सिलिंडर दरात 45.50 रुपयांची कपात

घरगुती सिलिंडर दर मात्र जैसे थे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

एलपीजी सिलिंडरवर केंद्र सरकारने थोडा दिलासा दिला आहे. सरकारने 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 45.50 रुपयांची कपात केली आहे. नवीन दर 1 मेपासून लागू झाले आहेत. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची (19 किलो) किंमत 45.50 रुपयांनी कमी केल्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये हा दर 1,595.50 रुपये झाला आहे. तर मुंबईत हाच दर आता प्रतिसिलिंडर 1,545.00 पर्यंत खाली आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत डिसेंबरपासून 200 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, या दरात सध्या कोणताही बदल केलेला नाही.

नोव्हेंबरमध्ये दिल्लीत विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपये होती. 1 डिसेंबर रोजी त्याची किंमत वाढून 644 रुपयांवर गेली होती. 15 डिसेंबर रोजी ते 50 रुपयांनी वाढवून 694 रुपयांवर गेले. 4 फेब्रुवारीला सिलिंडर दर  25 रुपयांनी वाढून 719 रुपये झाला. यानंतर 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा 50 रुपये प्रतिसिलिंडर वाढविण्यात आले. तसेच 25 फेब्रुवारीला 25 रुपये आणि 1 मार्च रोजी 25 रुपयांच्या दरवाढीनंतर सिलिंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. गेल्या 7 वर्षांत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत (14.2 किलो) दुपटीने वाढून 809 रुपये प्रतिसिलिंडर झाली आहे. 1 मार्च 2014 रोजी घरगुती गॅस सिलिंडर 410 रुपये होता. आता हाच दर 810 रुपयांच्या वर पोहोचला आहे.

Related Stories

दिल्लीत रायसीना डायलॉगला प्रारंभ

Patil_p

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Patil_p

लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार

Patil_p

लष्करातील खर्चात 20 टक्के कपात

Patil_p

‘ओएमजी’ यांचे गुढगे दिसत आहेत म्हणत प्रियांका गांधींनी साधला भाजपवर निशाणा

Archana Banage

‘भीतीची भावना’ जिल्हा न्यायाधीशांना जामीन देण्यापासून रोखते – सरन्यायाधीश चंद्रचूड

Archana Banage