Tarun Bharat

”व्वा! मोदीजी व्वा ! खासदार पण महागाईमुळे चूल वापरायला लागले”

ऑनलाईन टीम / मुंबई

देशात महागाईचा आलेख चढताच असून यामुळे सामान्य जनेतून नाराजीचा सूर उमटत आहे. तर विरोधी पक्ष ही मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहे. याच मुद्यावरुन संसदभवनात काँग्रेसह विरोधी पक्षांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेले काही दिवसांपासून भाजप खासदार नवनीत कौर राणा यांचा चुलीवर स्वयंपाक करत असल्याच्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या वरुन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोदींच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे चूल वापरायला लागले. असे ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

चाकणकर यांनी ”गॅस महाग झाल्यामुळे खासदार नवनीत कौर राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत.!” असे ट्वीट केले आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी उज्ज्वला योजना ही अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारच्या उज्जवला योजनेद्वारे देशात सहा कोटी मोफत गॅसजोडणी केली असली तरी नागरिकांना दुसरे सिलेंडर घेणे परवडत नसल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे.

Related Stories

मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस नेता सर्वोच्च न्यायालयात

datta jadhav

एसटीची वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील, आज ३६ गाड्या धावल्या

Archana Banage

काँग्रेसच्या ऑफरला उर्मिलाचा नकार : विजय वडेट्टीवार

Tousif Mujawar

पुराच्या पाण्यातून जीवघेणी वाहतूक, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास

datta jadhav

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

datta jadhav

कृष्णा कारखान्याच्या सत्तेचा आज फैसला

Patil_p