Tarun Bharat

व्हन्नूरजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Advertisements

प्रतिनिधी / कागल

कागल – मुरगूड राज्य मार्गावर व्हन्नूर फाटा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. या अपघातात मूळचे हळदी ता. कागल (सध्या रा.गोरंबे ) येथील हणमंत नानासो पाटील ( वय -४५ ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी हणमंत पाटील हे आपली मोटरसायकलवरून (स्प्लेडर क्र.एमएच ०९ एजे- ५७२२ ) सकाळी ६ च्या सुमारास कागल येथील पंचतारांकीत वसाहतीकडे कामावर निघाले होते. व्हन्नूर फाटा येथे आले असता मुरगूडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ( क्र. एमएच ०६ के. ७१७८ ) पाटील यांच्या दुचाकीस समोरून जोराची धडक दिली.

या धडकेत हणमंत पाटील हे गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यु झाला. पाटील हे मुळचे हळदी येथील रहिवाशी आहेत. पण कामाच्या ठिकाणी जाणे सोयीस्कर होणेसाठी पत्नीच्या गावी गारंबे ता. कागल येथे घर बांधून वास्तव्य करत होते. गेली १२ वर्षे ते एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबतची फिर्याद रंगराव पांडूरंग पाटील यांनी कागल पोलिसांत दिली आहे.अधिक तपास कागल पोलीस करीत आहेत.

Related Stories

जिल्हा परिषदेच्या सुधारित ५० कोटीच्या अर्थसंकल्पाला मान्यता

Abhijeet Shinde

सांगरुळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद

Abhijeet Shinde

नानारुपी, शब्दरुपी ‘शाहू महाराज’ आता एकाच ग्रंथरूपात!

Abhijeet Shinde

अब्रुनुकसानीच्या दाव्यासाठी `व्हाईट मनी’ लागतो

Abhijeet Shinde

जिल्हा परिषदेतील ७७ कर्मचारी लेट कमर्स

Abhijeet Shinde

चंदूरातील दोन्ही राजकीय गटात वादावादी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!