Tarun Bharat

व्हिएतनामकडून प्रथमच भारतीय तांदळाची खरेदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मोठय़ा प्रमाणात तांदळाची निर्यात करणारा देश अशी ख्याती मिळविलेल्या व्हिएतनाम या देशाने अनेक दशकांमध्ये प्रथमच भारतीय तांदळाची खरेदी सुरू केली आहे. व्हिएतनाम हा जगातील तिसऱया क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश मानला जातो. या देशातील स्थानिक बाजारपेठेत तांदळाचा पुरवठा कमी झाल्याने दर वाढले आहेत. ते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताकडून खरेदी करण्यात येत आहे. भारतात तांदळाचे दर कमी असल्याने अनेक देशांनी थायलंडच्या ऐवजी भारताकडून तांदूळ खरेदी सुरू केली. या देशांमध्ये व्हिएतनामचाही समावेश आता झाला आहे. जानेवारीत हा देश भारताकडून 70 हजार टन तांदळाची कणी विकत घेणार आहे. त्या देशात कणीचा दर 500 ते 505 डॉलर्स प्रतीटन आहे. तर भारतात याच कणीचा दर 381 ते 387 डॉलर्स प्रतीटन इतका आहे.

Related Stories

पर्यावरण रक्षणासाठी ‘संघा’चा पुढाकार

Patil_p

रायगड किनारपट्टीवर आठ मृतदेह आढळल्याने खळबळ

datta jadhav

‘क्वाड’ कडून दहशतवादाचा एकमुखी निषेध

Patil_p

बंगाल खाडीमध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

Tousif Mujawar

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तोंडावर अयोध्येत कोरोनाची धडक!

Tousif Mujawar

अमित शाहांवर गुन्हा का दाखल केला नाही? कर्नाटक उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना सवाल

Archana Banage