- शरिरात कोलेजन तयार करण्यासाठी ‘व्हिटॅमिन-सी’ची गरज असते. कोलेजन हे शरिरातील एक प्रकारचे प्रोटिन आहे. ते आपले केस, त्वचा, नख यात आढळून येणार्या ऊतकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. असे असले तरी व्हिटॅमिन सीची गोळी किंवा कॅप्सूल घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- कोविडच्या काळात सर्वांना व्हिटॅमिन-सीचे महत्त्व कळून चुकले आहे. परंतु कदाचित आपल्याला ठावूक नसेल की आपले शरीर नैसर्गिक रुपाने या जीवनसत्त्वाची निर्मिती करू शकत नाही.
- क जीवनसत्त्व शरीराला लिंबू, संत्रे, स्ट्रॉबेरी, किवी फळ, ब्रोकोली, केळी आणि पालकासह अनेक फळे आणि भाजीपाल्यातून मिळते. सर्वसाधारपणे व्हिटॅमिन-सीचे सेवन खाद्यपदार्थातून करावे, असा सल्ला दिला जातो. पण हल्ली बहुतांश मंडळी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सप्लिमेंटस घेण्याचा विचार करतात.
- याशिवाय अनेकदा डॉक्टर देखील व्हिटॅमिन सीची गोळी किंवा कॅप्सूल घेण्याचा सल्ला देतात.
- व्हिटॅमिन सी हे एक शक्तीशाली अँटीऑक्सिडेंट असून ते शरिराला नैसर्गिक सुरक्षा प्रदान करतात. मग ही सुरक्षा गोळीरुपातून मिळवा किंवा नैसर्गिक रुपाने. सी व्हिटॅमिन रक्तातील अँटीऑक्सिडेंटची पातळी वाढवण्याचे काम करते.
- नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉमरेशनच्या अभ्यासातून एक गेष्ट लक्षात येते की, मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने रक्तात अँटीऑक्सिडेंटची पातळी 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
- एनसीबीआय’च्या मते, उच्च रक्तदाब असलेल्या ज्येष्ठ नागरिकांत ‘व्हिटॅमिन-सी’ चा डोस हा सिस्टॉलिक रक्तदाबाला सरासरी 4.9 एमएमएचजी आणि डायस्टोलिक रक्तदाबाला सरासरी 1.7 एमएमएचजीपर्यंत कमी करतो.
- व्हिटॅमिन-सीमुळे शरीरातील लोहाचा (आयरन) अभाव कमी होतो. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या आयर्नच्या अवशोषणाला चांगले करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन सी हे खराब अवशेषित आयरनला परावर्तित करण्यासाठी मदत करते आणि हे आयरन अशक्तपणाची जोखीम कमी करू शकते.


previous post