Tarun Bharat

व्हिडिओ कॉल येऊ शकतो अंगलट!

फेसबुकवरील चॅटींग, व्हिडिओ कॉलचा ब्लॅकमेलसाठी होतोय वापर : सोशल मीडिया हाताळताना सावध राहण्याचा इशारा

प्रतिनिधी /बेळगाव

फेसबुकवर येणारी अनोळखी प्रेंड रिक्वेस्ट व ती स्वीकारल्यानंतर होणारी चॅटींग, व्हिडिओ कॉल अंगलट येऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केले. सोमवारी यासंबंधी एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

अलीकडे फेसबुकवर अनोळखी तरुणींच्या प्रेंड रिक्वेस्ट येण्याचे प्रकार वाढले आहेत. ती स्वीकारल्यानंतर मॅसेंजरमध्ये चॅटींग सुरू होते. त्यानंतर सावजाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्याला कॉल केला जातो. एक दिवस व्हिडिओ कॉल करून आपल्या अवयवांचे दर्शन घडवून तुम्हीही कपडे उतरवा, असे सांगून त्याला नग्न होण्यास भाग पाडले जाते.

भावनेच्या भरात केलेला कॉल स्क्रीन रेकॉर्डरच्या माध्यमातून रेकॉर्ड होत असतो. अशा पद्धतीने रेकॉर्ड झालेला व्हिडिओ सावजाला पाठवून पैशासाठी त्याला धमकाविण्याचा प्रकार घडतो. पैसे दिले नाही तर फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल करू, असे धमकाविण्यात येते. सध्या असे प्रकार वाढले आहेत. वाढते प्रकार लक्षात घेऊन पोलीस उपायुक्तांनी वरील आवाहन केले आहे. अनोळखींकडून आलेले प्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. आपल्या व्हॉट्सऍपवर येणाऱया अनोळखींचे कॉलही घेऊ नयेत. जर अशा पद्धतीने कोणाची फसवणूक होत असेल तर संबंधितांनी भामटय़ांच्या धमक्मयांना भीक न घालता, त्यांना पैसे न देता सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहर व उपनगरांत असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामुळेच नागरिकांनी फेसबुकवरील प्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावध राहण्याचे आवाहन केले असून या टोळीच्या कारवायांना कोणी बळी पडू नये, असे आवाहनही डॉ. आमटे यांनी केले आहे.

Related Stories

मोहन मोरे इलेव्हन- अलोन मुंबई अंतिम लढत आज

Patil_p

97 विद्यार्थ्यांमागे केवळ 3 शिक्षक

Omkar B

न्यायालय आवारातच व्हिडिओद्वारे पक्षकारांची घेतली साक्ष

Patil_p

आयसीएमआरच्या कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा

Patil_p

बेंगळूरचा के.रूबल ‘मि.पंचमुखी’ किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

सकारात्मक विचारामुळे जीवन बनते आनंदी

Amit Kulkarni