Tarun Bharat

व्हिडिओ गेमने बदलले नशीब

सुपर मारियो गेमच्या प्रतीचा लिलाव , 4 कोटी 84 लाख रुपयांची किंमत

35 वर्षांपूर्वी ड्रॉवरवर ठेवून पडला होता विसर

निनटेंडोच्या सुपर मारियो ब्रदर्स व्हिडिओ गेमच्या जुन्या कॉपीने अमेरिकेत एका व्यक्तीचे नशीबच पालटले आहे. 1986 मध्ये नाताळाच्या गिफ्टसाठी खरेदी करण्यात आलेल्या गेमला एका टेबलच्या ड्रॉवरवर ठेवल्यावर संबंधित व्यक्तीला याचा विसर पडला होता. डल्लासमध्ये लिलावघर हॅरिटेज ऑक्शन्सनुसार या व्हिडिओ गेमच्या कॉपीला 4 कोटी 84 लाख रुपयांची किंमत मिळाली आहे. ही किंमत कुठल्याही व्हिडिओ गेमसाठी विक्रमी ठरली आहे.

व्हिडिओ गेमची ही कॉपी 35 वर्षांपर्यंतच टेबलच्या ड्रॉवरमध्ये पडून होती. हा गेम 1986 च्या अखेरीस काही काळासाठी तयार करण्यात आला होता. या कॉपीची निर्मिती खूपच कमी कालावधीसाठी झाली होती अशी माहिती हेरिटेजमध्ये व्हिडिओ गेमची विक्री हाताळणाऱया वेलेरी मेकलेकी यांनी दिली आहे.

व्हिडिओ गेम विकणाऱया आणि खरेदी करणाऱयाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. लोकप्रिय व्हिडिओ गेम सुपर मारियो ब्रदर्सची निर्मिती पहिल्यांदा 1986 मध्ये करण्यात आली होती. यानंतर या गेमचे अनेक प्रकार उपलब्ध झाले होते. यात दोन भाऊ  मारियो आणि लुगी अपहृत राजकन्यांना आततायी राजांच्या कैदेतून सोडवतात. सुपर मारियो सनशाइन, सुपर मारियो गॅलेक्सी, सुपर मारियो ऑडिसीसह अनेक गेम आले आहेत. सर्वात नवा गेम सुपर मारियो 3डी वर्ल्ड फेब्रुवारीत सादर झाला आहे.

Related Stories

2024 च्या निवडणुकीसाठी राहुल गांधी सक्रीय

Amit Kulkarni

सर्वांना माहीत आहे ‘सीमे’ वरील हकीकत : राहुल गांधी

Tousif Mujawar

अन्नधान्याचे होणार विक्रमी उत्पादन

Patil_p

”मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे”

Archana Banage

‘फायझर’च्या 5 कोटी लस भारत खरेदी करणार

Patil_p

पीएफआयसंबंधी मजकूर डीलिट करण्याचा आदेश

Amit Kulkarni