Tarun Bharat

व्हीटीयूचा पदवीदान समारंभ 3 एप्रिलला

कुलगुरु प्रा. करिसिद्दप्पा यांची पत्रकार परिषदेत माहिती : कोरोनामुळे केवळ 100 विद्यार्थ्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी

प्रतिनिधी / बेळगाव

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा (व्हीटीयू) 20 वा वार्षिक पदवीदान समारंभ शनिवार दि. 3 एप्रिल रोजी होणार आहे. यावषी कोरोनामुळे केवळ 100 विद्यार्थ्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. पदवीदान समारंभासाठी राज्यपाल वजुभाई वाला, पद्मविभूषण विजेते व भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार प्रा. व्ही. के. अत्रे उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारत सरकारच्या सायन्स व टेक्नॉलॉजी विभागाचे सेपेटरी प्रा. आशुतोष शर्मा यांना मानद पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती व्हीटीयूचे कुलगुरु प्रा. करिसिद्दप्पा यांनी मंगळवारी व्हीटीयू येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावषी 63 हजार 160 विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग, 892 बी. आर्किटेक्चर, 4 हजार 817 एमबीए, 1248 एमसीए, 1704 एम. टेक, 77 एम. आर्किटेक्चर, 278 पीजी डिप्लोमा पदवी, 635 पीएचडी, 5 एमएस्सी (इंजिनिअरिंग) पूर्ण केले आहे. कोरोनामुळे यावषी मोजक्मयाच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असल्याने उर्वरित विद्यार्थी लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून जोडले जाणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.

अस्मत शर्मिनला 13 सुवर्णपदके

पदवीदान समारंभात एकूण 13 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन गौरविले जाणार आहे. मंगळूर येथील सहय़ाद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी अस्मत शर्मिन हिने तब्बल 13 सुवर्णपदके मिळविली आहेत. बेंगळूर येथील अरुण डी. याने 7 सुवर्णपदक, गंगा रेड्डी हिने 7 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या पत्रकार परिषदेवेळी रजिस्ट्रार प्रा. ए. एस. देशपांडे, रजिस्ट्रार (मूल्यमापन) प्रा. डॉ. बी. ई. रंगास्वामी उपस्थित होते.

यावषी निकालाचा टक्का वाढला

कोरोनामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत येणे शक्मय नसल्याने ते घरीच राहून अभ्यास करीत होते. त्यामुळे यावषी निकाल कमी लागेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. परंतु यावषी मागील वर्षाच्या तुलनेत निकालात वाढ झाली आहे. मागीलवषी विद्यापीठाचा  निकाल 76 टक्के होता. तो यावषी 80.78 टक्क्मयांवर पोहोचला आहे. परंतु एमसीए विभागाचा निकाल घसरल्याचे यावेळी सांगण्यात आले.

व्हीटीयूमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही

व्हीटीयू हे देशातील एक नामवंत विद्यापीठ आहे. दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याने देशात, परदेशात विद्यापीठाचे नाव प्रसिद्ध आहे. परंतु विद्यापीठावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत असतात. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक त्रुटी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. परंतु ते सत्य नसून ऑडिट रिपोर्ट तपासण्यासाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठासंबंधित आरोप चुकीचे असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले

राज्यात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या

  • बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग 63 हजार 160
  • बॅचलर ऑफ आर्किटेक्चर 892
  • एमबीए 4 हजार 817
  • एमसीए 1 हजार 248
  • एमटेक 1 हजार 704 पीएचडी 635

Related Stories

उचगाव येथील गणेश विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

शासकीय कागदपत्रांच्या सेवा शुल्कात वाढ

Patil_p

वन्य प्राण्यांचा मानवावरील हल्ल्याचा प्रश्न ऐरणीवर

Amit Kulkarni

नावगे क्रिकेट स्पर्धेत गणेश स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

झाडशहापूर येथील औषध शिबिर रद्द

Amit Kulkarni

कर्नाटकः १०० वर्षाच्या वृद्ध महिलेची कोरोनावर मात

Archana Banage