Tarun Bharat

व्हीटीयू-एअरफोर्समध्ये समन्वय करार

एअरफोर्स अधिकाऱयांना एअरोनॉटिकल क्षेत्रात संशोधन करणे होणार सोयीचे

प्रतिनिधी /बेळगाव

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) व एअरफोर्स टेक्निकल कॉलेज (एएफटीसी) या दोन संस्थांमध्ये एअरोनॉटिकल इंजिनियरिंगच्या एमटेक अभ्यासक्रमासाठी समन्वय करार करण्यात आला आहे. दोन्ही संस्थाप्रमुखांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या. या करारामुळे कौशल्य व संशोधनासाठी मदत होणार आहे.

एअरफोर्सचे एअर कमांडर बी.जी. फिलीप यांनी व्हीटीयूचे कौतुक करत एमटेक करणाऱया एअरफोर्सच्या सर्व अधिकाऱयांना या कराराचा फायदा होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला व्हीटीयूचे कुलगुरू डॉ. करिसिद्धप्पा उपस्थित होते. एअरोनॉटिकल इंजिनियरिंग विभागात सहा वेगवेगळय़ा प्रकारांमध्ये शिक्षण घेता येते. यामुळे एअरफोर्सच्या अधिकाऱयांना एअरोनॉटिकल क्षेत्रात संशोधन करणे सोयीचे होणार आहे. यावेळी व्हीटीयूचे रजिस्ट्रार डॉ. ए. एस. देशपांडे, ग्रुप कॅप्टन डॉ. राजू, मॅनेजमेंट स्टडीज ऍण्ड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. महेश इम्मी, विशेष अधिकारी डॉ. एम. एम. मुन्शी, डॉ. एस. बी. हलभावी यांच्यासह इतर अधिकारीवर्ग यावेळी उपस्थित होता.

Related Stories

उचगाव ग्रा.पं.मध्ये वनमहोत्सव

Patil_p

उमेदवारासोबत फिरण्यासाठी 500 रुपये

Patil_p

खड्डय़ातील पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू

Amit Kulkarni

तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील ‘त्या’ गटारीवर काँक्रिट घाला

Amit Kulkarni

हेस्कॉमचे कर्मचारी कमी असल्यामुळे समस्या

Amit Kulkarni

मार्केट यार्डात भाजीपाल्याचे भाव कोसळले

Patil_p