Tarun Bharat

व्हीपीकेचे अर्बनचे सर्व व्यवहार सहकार निबंधकाच्या निर्देशानुसारच

Advertisements

सुर्या गावडे पॅनलला परत निवडून द्या : सुर्या गावडे पॅनलचे पत्रकार परिषदेतून आवाहन,विरोधी गटाने केलेल्या आरोपाचे खंडण

प्रतिनिधी / फोंडा

व्हीपीके संस्थेमध्ये कोणतेही गैरव्यवस्थापन झालेले नसून सर्व व्यवहार सहकार निबंधकाच्या निर्देशानुसार सुरळीतपणे पार पडत आहे. कोरोना व इतर अडचणीमुळे संस्थेच्या नफ्यात घट झालेली आहे. त्याला सर्वस्वी अध्यक्षाला जबाबदार धरणे चुकीची बाब असल्याची माहिती विद्यमान अध्यक्ष सुर्या गावडे यांनी दिली. गेली पाच वर्षे संस्थेच्या नफ्यात सातत्याने घट ही केवळ आपल्या चुकीच्या निर्णयामुळे या हिरू खेडेकर यांनी केलेल्या आरोपाचे खंडनही गावडे यांनी केले आहे.   

व्हीपीकेच्या सुर्या गावडे पॅनलतर्फे काल शुक्रवारी फर्मागुडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण करताना येत्या निवडणूक पुनः आपलेच पॅनलचे सर्व अकराही उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी सुर्या गावडे पॅनलचे उमेदवार खुद्द सुर्या गावडे, पांडुरंग गावडे, रोहिदास प्रियोळकर, ऍड. समीर खेडेकर, महेश खेडेकर, शशिकांत बोरकर, शाम सांगोडकर, चंद्रकांत गावडे, रोशन गावडे, सुभाष गावडे उपस्थित होते. सदर पॅनलच्या पुनम फडते यावेळी अनुपस्थित होत्या.

फॅमिलीराजचा आरोप करणाऱयांनी आपल्या गटात डोकावून पाहावे 

 आमच्या पॅनलवर फॅमिली राजचा टपका ठेवण्याऱयानी प्रथम आपल्या सहकार परिवर्तन पॅनेलमध्ये सर्रास सुरू असलेले फॅमिलराज आधी डोकावून पाहावे असा खोचक सल्ला संचालक पांडुरंग गावडे यांनी दिला. व्यवस्थापकीय संचालक हे सर्रासपणे सहकार परिवर्तन मंचबरोबर निवडणूक प्रचारात सहभाग घेत असल्यामुळे कोणचा स्वार्थ दडलेला आहे हे आधी स्पष्ट करावे. राजकीय वरदसहस्त लाभल्यामुळे असा मनमानी व्यवहार व्यवस्थापकीय संचालकांनी चालविलेला आहे.  याप्रकरणी सहकार निबंधकाकडे तक्रार नोंदविण्यात आलेली आहे. आमचे पॅनल प्रत्येक कर्मचाऱयासह सर्व भागधारकांचे हित जपणारे आहे. पगारवाढ संदर्भात कर्मचाऱयाची  नाराजी यावर स्पष्टीकरण देताना सुर्या गावडे म्हणाले की बोनस सर्व कर्मचाऱयांना व्यवस्थित मिळालेला आहे. फक्त ज्या कर्मचाऱयांना दहा वर्षे व बारा वर्षे असा सेवाकाळ पुर्ण झालेला आहे अशा कर्मचाऱयांच्या वेतनशेणीवर सहकार खात्याने निर्बध आणल्यामुळे सदर परिस्थिती उद्भवल्याची माहिती दिली. सहकार परिवर्तन पॅनलमध्ये अकरापैकी सात उमेदवार विद्यमान संचालक असल्यामुळे तेही तेवढेच जबाबदार ठरतात अशी बाब लक्षात आणून दिली.

या सर्व बाबींचा भागधारकांनी सारासार विचार करून मतदानाचा हक्क बजावावा. रविवार 18 रोजी होणाऱया निवडणूक सुर्या गावडे पॅनलला परत एकदा निवडून द्यावे असे आवाहन सुर्या गावडे पॅनलने केले आहे.

Related Stories

उघडय़ावर कचरा फेकणाऱयांविरूध्द मुरगाव पालिकेची दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

गोवा आयुर्वेदीक डॉक्टर संघटणेकडून दुर्गादास कामत याचा निषेध

Amit Kulkarni

जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी कार्यरत रहा

Amit Kulkarni

महिला काँग्रेसकडून मूक मेणबत्ती मोर्चे

Amit Kulkarni

फोंडा शहर सायंकाळनंतर सामसूम

Amit Kulkarni

नवे औद्योगिक धोरण दोन महिन्यात

Amit Kulkarni
error: Content is protected !!