Tarun Bharat

व्हीपीके अर्बनवर परिवर्तन

Advertisements

सहकार परिवर्तन गटाचे सर्व अकराही उमेदवार विजयी : सुर्या गावडे पॅनलला जबर धक्का

प्रतिनिधी / फोंडा

राज्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा व्हीपीके अर्बन सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत हिरु खेडेकर यांच्या नेतृत्त्वाखालील व्हीपीके सहकार परिवर्तन पॅनलने सर्व अकराही जागांवर मोठय़ा मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत प्रतिस्पर्धी डॉ. सुर्या गावडे पॅनलमधील सर्वच्या सर्व उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला.

 व्हीपीकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनल व सुर्या गावडे पॅनल अशी थेट लढत झाली. सोमवारी कुर्टी येथील सहकार भवनमध्ये दिवसभर मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर रात्री उशिरा हा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात हिरु खेडेकर यांच्या नेतृत्त्वाखालील सहकार परिवर्तन पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. विजयी गटातील सर्व उमेदवारांनी मोठय़ा मताधिक्क्याच्या फरकाने ही निवडणूक जिंकली आहे. विरोधी गटातील विद्यमान अध्यक्ष सुर्या गावडे, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे यांच्यासह संपूर्ण पॅनलला पराभवाचा धक्का बसला.

विजयी सहकार परिवर्तन पॅनलमध्ये दुर्गादास लाडू गावडे, आनंद बाबल केरकर, दिना बेतू बांदोडकर, चिराग यशवंत गावडे, हेमंत दत्ता गावडे, रामा उर्फ सूर्या जयवंत गावडे, सूर्यकांत पुरुषोत्तम गावडे, हिरु शाणू खेडेकर, सावित्री रामदास वेलिंगकर, ऍड. सुषमा जानू गावडे व रोहिदास अंतुलो गावडे यांचा समावेश आहे.

डॉ. सुर्या गावडे यांच्या पॅनलमधील सुर्या गावडे यांच्यासह शशिकांत रामा बोरकर, चंद्रकांत बाबया गावडे, सुभाष शंकर गावडे, महेश गणेश खेडेकर, समीर पुंडलिक खेडेकर, रोहिदास फोंडू प्रियोळकर, श्याम सदा सांगोडकर, पूनम राजीव फडते, रोशन चंद्रकांत गावडे व पांडुरंग शंकर गावडे या सर्व अकराही उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  रविवारी झालेल्या या निवडणुकीत 9916 मतदारांनी मतदान केले होते. व्हीपीकेच्या संपूर्ण गोव्यात 40 शाखा असून साधारण 1 लाख 5 हजार भागधारकांना मतदानाचा अधिकार आहे. प्रत्यक्षात 9916 मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी सर्वाधिक 3861 मतदान फोंडा तालुक्यात झाले होते. बहुतेक तालुक्यांमध्ये सहकार परिवर्तन गटाने मतांची आघाडी मिळविली आहे.

Related Stories

दहावी परीक्षेचा निणर्य योग्यच

Omkar B

दिल्ली एफसीचा 5-1 गोलानी पराभव करून एफसी गोवा उपान्त्य फेरीत

Amit Kulkarni

सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी-विक्री करा

Patil_p

खंडित विजेच्या समस्येमुळे मोले, कुळेतील नागरिक आक्रमक

Patil_p

फर्मागुडी येथे 19 रोजी शिवजयंती उत्सव

Omkar B

भाजपावासी आमदारांना भवितव्याची चिंता

Patil_p
error: Content is protected !!