Tarun Bharat

व्हॅक्सिन डेपो येथे झाडांची बेसुमार कत्तल

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावचे नैसर्गिक वैभव ठरलेल्या व्हॅक्सिन डेपोमध्येच सध्या झाडांची बेसुमार कत्तल सुरू झाली आहे. अनेक जुने वृक्ष तोडण्यात येत आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणी बेळगावच्या नागरिकांमधून केली जात आहे.

बेळगावच्या इतिहासामध्ये अनेक घटनांचा व्हॅक्सिन डेपो साक्षीदार आहे. व्हॅक्सिन डेपोमध्ये शेकडो वर्षे जुने वृक्ष पाहायला मिळतात. निसर्गसौंदर्याने व्हॅक्सिन डेपोचा संपूर्ण परिसर नटला आहे. त्यामुळेच विविध प्रकारचे पक्षी-प्राण्यांचा अधिवास या परिसरात जाणवतो.

परंतु मागील काही दिवसांपासून निसर्ग संपदेने नटलेल्या व्हॅक्सिन डेपोवरच घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसरात्र झाडे तोडण्याचे काम सुरू असूनही याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. एकीकडे झाडे लावण्यासाठी वन विभाग दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. दुसरीकडे शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही व्हॅक्सिन डेपो येथे विविध कारणांनी वृक्षतोड करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु बेळगावच्या नागरिकांनी तो हाणून पाडला होता. व्हॅक्सिन डेपो येथे अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती आहेत. वड, पिंपळ यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु या झाडांची बेसुमार कत्तल केली जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. नेमकी ही वृक्षतोड का केली जात आहे, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. 

Related Stories

नॉर्थ झोन, कॅम्प प्रकाश संघ अंतिम फेरीत

Amit Kulkarni

टिळकवाडी क्लब, सीसीआय बी संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

उद्योग खात्रीतून सहा हजार कामगारांना काम

Amit Kulkarni

लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सुळेभावी भागात जोरदार प्रचार

Amit Kulkarni

वीर दास यांचा शो रद्द करण्याची हिंदूत्ववादी संघटनांची मागणी

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!