Tarun Bharat

व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर करेक्शन करता येणार

‘को-विन’ ऍपच्या आधारे चूक सुधारण्याची संधी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करताना स्वतःची वैयक्तिक माहिती देण्यास काही चूक झाली असेल तर घाबरण्याचे कारण नाही. लस लाभार्थी आता प्रमाणपत्रातील चूक दुरूस्त करू शकणार आहे. को-विन पोर्टलवर यासंबंधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करताना नाव, जन्म तारीख किंवा लिंग चुकीचे नमूद झाल्यास आता ही चूक सुधारून नवीन सर्टिफिकेट मिळवता येणार आहे. चूक सुधारण्यासाठी पोर्टलवरून माहितीमध्ये  फक्त एक वेळाच माहिती अपडेट करता येईल. त्यानंतर लाभार्थी अपडेट सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकतील.

सोशल मीडियावर शेअर करु नका सर्टिफिकेट

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱया ‘सायबर दोस्त’ या संस्थेने ट्विट करत नागरिकांनी व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करु नका असे आवाहन केले आहे. सदर सर्टिफिकेटवर नाव, बर्थ डेट, वय, लिंग आणि लस घेतलेल्या दिवसाची तारीखसह अनेक महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश असतो. त्यामुळे ही माहिती सोशल मीडियावर शेअर करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.   सायबर गुन्हेगार या माहितीचा उपयोग ऑनलाईन फसवणूक करण्याची शक्यता गृहित धरून नागरिकांनी आपले व्हॅक्सिन सर्टिफिकेट कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करु नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

माहिती अपडेट करण्यासाठी टप्पे…

@ सर्वप्रथम ‘को-विन’ पोर्टलला भेट द्या.

@ मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा.

@ त्यानंतर ‘रेझ ऍन इश्यू’वर क्लिक करा.

@ ‘करेक्शन इन सर्टिफिकेट’वर क्लिक करा.

Related Stories

अर्थसंकल्पापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू

datta jadhav

कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar

Lakhimpur Kheri: प्रियंका गांधींच्या खोलीबाहेर ड्रोन? छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी शेअर केला व्हिडिओ

Archana Banage

पाकिस्तानी ड्रोनची पुन्हा घुसखोरी

Patil_p

75 टक्के बाधितांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट

Amit Kulkarni

उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपची सरकारे शक्य

Patil_p