Tarun Bharat

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावावर होणारे गैरप्रकार थांबवा

हिंदू जनजागृतीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या काही वर्षांपासून पाश्चात्य संस्कृतीचा पगडा वाढत चालला आहे. पूर्वी कधीच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात येत नव्हता. आता 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होताना दिसत आहे. मात्र, मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर हिंसक घटनाही घडल्या आहेत. तेव्हा ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी मातृ-पितृ पूजन दिन म्हणून त्या दिवशी आई-वडिलांचे आशीर्वाद तरुणांनी घ्यावेत यासाठी तरुणांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.

‘व्हॅलेंटाईन डे’दिवशी विद्यालये, महाविद्यालये परिसरात वेगवेगळे प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृती धोक्मयात येत आहे. लव्ह जिहादसारखे प्रकारही घडत आहेत. महिलांवर अत्याचार होताना दिसत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा संस्कृती जपणे गरजेचे असून त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना मार्गदर्शनाची गरज असून त्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी करण्यात आली.

शिक्षणाधिकाऱयांनी यासाठी प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रथम शिक्षक व संचालकांना सूचना करावी. त्यानंतर त्यांनी आपल्या शाळेत अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यासाठी विद्यार्थ्यांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सुधीर हेरेकर, माधुरी जाधव, अक्काताई सुतार, अंकिता सोमनाचे, ऋषिकेश गुर्जर, सदानंद मासेकर, मिलनताई पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

देवी शारदे कोरोना हद्दपार कर!

Patil_p

वीज उपकेंद्रात बिघाड,शहर अंधारात

Amit Kulkarni

बेकायदा मांस वाहतूक करणारे वाहन ताब्यात

Tousif Mujawar

ऑटोरिक्षा, कॅब चालकांना मदतीसाठी अर्जाचे आवाहन

Amit Kulkarni

मोहनगा यात्रेला 27 पासून प्रारंभ

Amit Kulkarni

जीपीएसकरिता नकाशा सादर करण्यासाठी मनपाचे पथक बागलकोटला

Patil_p