वृत्तसंस्था/ बार्सिलोना
ला लीगा फुटबॉल स्पर्धेत व्हॅलेन्सिया फुटबॉल क्लबची कामगिरी दर्जेदार न झाल्याने त्यांना या स्पर्धेच्या रिलेगेशन विभागात राहावे लागले. व्हॅलेन्सियाची 6 गुणांसह घसरण झाल्याने या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी स्पॅनीश फुटबॉल प्रशिक्षक जेव्ही ग्रेसिया यांची हकालपट्टी केली आहे.
रविवारी ला लीगा स्पर्धेतील झालेल्या सामन्यात व्हॅलेन्सिया संघाला बार्सिलोना संघाकडून 2-3 अशा गोल फरकाने पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेच्या लीग गटातील व्हॅलेन्सियाचा हा सलग सहावा पराभव असल्याने त्यांना स्पर्धेच्या गुणतक्त्यात 14 व्या स्थानावर समाधान मानावे लागल्याने ग्रेसिया यांची प्रमुख प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली. आता त्यांच्या जागी काळजीवाहू प्रशिक्षक म्हणून व्होरोची नियुक्ती करण्यात आली आहे.