Tarun Bharat

व्हेरेव्हचे माद्रीद स्पर्धेतील दुसरे जेतेपद

वृत्तसंस्था / माद्रीद

एटीपी टूरवरील येथे झालेल्या माद्रीद मास्टर्स खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हने इटलीच्या बेरेटेनीचा पराभव करत दुसऱयांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. एटीपीच्या मास्टर्स 1000 स्पर्धेतील त्याचे हे चौथे विजेतेपद आहे.

रविवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने इटलीच्या मॅटेव बेरेटेनीचा 6-7 (6-8), 6-4, 6-3 असा पराभव केला. व्हेरेव्ह आता प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. रोममध्ये ही स्पर्धा पुढील आठवडय़ात सुरू होणार आहे. माद्रीद स्पर्धेत पाचव्या मानांकित व्हेरेव्हला जेतेपदासाठी दोन तास, 40 मिनिटे झगडावे लागले. 2019 नंतर व्हेरेव्हचे क्लेकोर्टवरील स्पर्धेचे हे पहिले विजेतेपद आहे. माद्रीद स्पधेंत यावेळी व्हेरेव्हने स्पेनचा अव्वल राफेल नदाल आण ऑस्ट्रीयाचा थिएम यांचा पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

Related Stories

विराट कोहलीला कन्यारत्नाचा लाभ

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर 9 गडय़ांनी विजय

Amit Kulkarni

कार्लसनला हरविणारा डी.गुकेश सर्वात युवा खेळाडू

Amit Kulkarni

सात्विक-चिराग शेट्टी दुसऱया फेरीत

Patil_p

ओमान क्रिकेटकडून मुंबईला निमंत्रण

Patil_p

नदाल, अल्कारेझ, स्वायटेक, कॉलिन्स तिसऱया फेरीत

Patil_p